**प्रयोगशाळा**
“पण तू मला नगरनायकाला का भेटवू इच्छित आहेस?” अजातरिपू त्याचे एक यंत्र दुरुस्त करत होता.
“ खरं सांगायचं तर आपला नगरनायका बद्दल गैरसमज झाला. जेव्हा मी नगरनायकांना सांगितले कि माझे तुझ्यावर प्रेम आहे हे ऐकून नगरनायक खूपच खुश झाले आणि म्हणाले मी कोणालाही बळजबरीने माझी राणी बनवू इच्छित नाही. तू खुशाल अजातरिपूशी विवाह करू शकतेस.” हंसरेखा.
तिचे म्हणणे अजातरिपू ऐकत होता दुसरीकडे हाताने त्याची दुरुस्ती चालूच होती.
“ नंतर जेव्हा मी त्यांना सांगितले कि तू एक वैज्ञानिक आहेस तेव्हा त्यांनी तुला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तू वेळ दवडू नकोस आपण लगेच जाऊन नगरनायकांना भेटूया. कदाचित ते तुला त्यांच्या मंत्रीमंडळातील प्रमुख वैज्ञानिक पद देऊ करतील. असं घडलं तर आपलं संपूर्ण आयुष्य अगदी आरामात जगता येईल.” हंसरेखा खूपच जास्त उत्साहाने सांगत होती.
अजातरिपूने त्याच्या हातातील काम थांबवले. तो तिच्या जवळ गेला तिचा हात हातात घेऊन म्हणाला
“आज नको हंसरेखा, उद्या जाऊया का? आज माझ्या प्रयोगशाळेत खूपच महत्वाची दुरुस्ती करावी लागणार आहे.”
“ठीक आहे उद्या जाऊया.” नाराज झालेली हंसरेखा तिच्या हाताला लागलेलं काळे ग्रीस पुसत निघून गेली.
क्रमश: