हि त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा या भरतखंडात धर्माचे पालन करणाऱ्या, गो-ब्राम्हण प्रतिपालक आणि प्रजेला आपल्या अपत्याप्रमाणे जपणाऱ्या क्षत्रियांचे राज्य होते. असे नाही कोणत्याही प्रकारचा अधर्म नव्हता परंतु अशा अधर्माचे निर्दालन करण्यासाठी सर्व राजे तत्पर होते. त्यांना वेद आणि शास्त्र यांचे ज्ञान होते. धर्माचे योग्य पद्धतीने पालन करणे आणि धर्माचे आचरण करणे यातच संपूर्ण राज्याचे हित आहे हि गोष्ट राजकुमारांना अगदी बालपणापासूनच शिकवली जात असे. हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. केवळ एक कल्पनाविलास या सदरातच वाचकांनी या कथेचा आस्वाद घ्यावा.