शूर्पकर्ण गजवदन तू अधिष्ठाता
सकल विद्यांचा दाता मंगलमूर्ती मोरया||

शेंदूरवर्ण कांती लंबोदर तू गजानन
सकल दुःखहर्ता मंगलमूर्ती मोरया||

 हरे विपदा तव सकलांची तूच विघ्नहर्ता
 सकल जनांचा श्वास तूच मंगलमूर्ती मोरया|| 

काया वाचा मनी तूच तू भाग्यविधाता
सकल कलांचा उगम तूच मंगलमूर्ती मोरया||

दिलास आधार मज सदा हरोनि संकट विघ्नहर्ता 
सकल जन्माचे सार्थक घडो सेवा मंगलमूर्ती मोरया||

तूच दिलेले हे शब्दांचे कोंदण हे बुद्धीदाता
सकल विचारांचा प्रणिता मंगलमूर्ती मोरया||

राहो  सन्मती मनीची  मिळो शक्ति  सदा शक्तीदाता
सकल संवेदनाची  जाणीव तूच मंगलमूर्ती मोरया 

सहजच सुचलेले मनीचे शब्द हे तूच त्याचा अधिष्ठाता
मिळे सर्व न मागता ही राहो सदैव कृपा मंगलमूर्ति मोरया||

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel