पश्चिमेस वसलेला स्वयंभू गणेश

समोर सागर निळसर विशाल

विसावला डोंगराच्या कुशीत

हिरवळ छान सभोवार अपार

सूर्यकिरणे पडती रथसप्तमी दिनी 

खोल गर्भ गाभा-यात वसे मूर्ती केशरी

प्रकटला  हा गणेश भक्त रक्षणासी 

महागणपती हा गणपतीपुळ्याचा....!!!

मुदगल पुराणात याचा उल्लेख २१ प्रसिद्ध गणपती स्थळात आढळून येतो.संकटनाशक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणपतीला गणपती स्तोत्रात पाचवे लंबोदर स्थान आहे.

भारताच्या अष्टदिशांच्या आठ द्वार देवता आहेत. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार  मानली जाते. 

याची गोष्ट मंदिराच्या आवारात लावलेल्या बोर्ड वरही वाचायला मिळतेच हा स्वयंभू गणेश कसा प्रकटला..

बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.

अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, "मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल." असा दृष्टांत झाला.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा (गणेश चतुर्थी) ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात देवळात उत्सव साजरा केला जातो. याचप्रमाणे माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमीपर्यंत उत्सव साजरा केला जातो.

गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. 

गणपतीची सगुणरुपातली उपासना पुढे गणपतीला परब्रम्ह रुपात पूर्ण होते अथर्वशीर्षात सांगितले आहेच विद्या बुद्धी ची देवता श्री गणेश त्याचा "..गं " हा बीजमंत्र सगुण ते परब्रम्हयाला दृढ करते,

शरीरातील मुलाधार चक्र यावर त्यचा अमंल ग म्हणजे शरीर  शरीरी वसे गणपती देवांचा देव आधिपती गणपती ही प्रकटे   गणपतीपुळी!!

गणपतीपुळे पूर्वी एक धार्मिक अध्यात्मिक स्थळ तर आता सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं पर्यटनस्थळ एक आवडते ठिकाण...

तेथील वारंवार मिळणारे  रानडे गुरुजींचे सहकार्य  उल्लेखनीय आभारयोग्य. गाभाऱ्यात फुलांची उत्तम सजावट करण्याचा त्यांचा हातखंडा कौतुकास्पदच ... .. शब्दरुपी मानसपूजा या शब्दांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न.सर्व पृथ्वी आरोग्यसंपन्न राहीलच असाच विश्वास .. ही गणपतीपुळेची मानसयात्रा......!!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel