ती स्त्री मूर्तिमंत सौंदर्याचे प्रतिक होती.तिच्या चेहेऱ्यामध्ये एक वेगळीच जादू होती.
ती इतकी अधिक आकर्षक होती कि तिच्याकडे एकदा पाहणार माणूस तिच्याकडे एकटक पाहतच बसेल.
अशीच काहीशी अवस्था प्रोफेसर ब्रिज यांची झाली होती कारण त्यांच्या समोर ती स्त्री उभी होती.
“ येस... हाउ में आय हेल्प यु?” त्यांनी तिला अत्यंत लाडीकपणे विचारले.
“ मी डॉक्टर आनंद वैशंपायन यांना भेटू इच्छिते.” ती
“ डॉक्टर आत मध्ये आहेत. परंतु आपले नक्की काम काय होते?” प्रोफेसर
“ मी त्यांची पत्नी आहे.” ती
प्रोफेसर ब्रिज पाहतच राहिले. मग त्यांनी आ वसलेल्या तोंडाने बेल वाजवली आहे चपराशी सदाला बोलावले.
“ सदा, प्लीज कॉल डॉक्टर विषम पाईन. त्यांना भेटायला त्यांची पत्नी आली आहे.”
“ हि इज ए लकी फेलो.” प्रोफेसर ब्रिज स्वत:शीच पुटपुटले.
“ कोण जाणे.” असे म्हणत मिसेस वैशंपायन खुर्चीवर बसल्या.
इतक्यात डॉक्टर वैशंपायन आले. त्यांच्याबरोबर विनय आणि गौतम दोघे होते.
“ अरे, नेहा! तू इथे?” वैशंपायन
“ नशीब तू मला ओळखलस. मला तर वाटलं होतं तू मला विसरला असशील. दोन वर्ष झाली आपल्याला भेटून.” मिसेस वैशंपायन चिडून बोलत होत्या.
“ तुम्ही बाहेरगावी गेला होतात का?” प्रोफेसर ब्रिज यांनी विचारले.
“ नाही. एकाच शहरात राहून देखील माझ्या नवऱ्याला मला भेटण्यासाठी वेळ नसतो.” नेहा वैशंपायन
“ नेहा नेहा.... तुला माहिती आहे माझ्यासाठी हे प्रोजेक्ट किती महत्वाचे आहे. मी गेल्या दोन वर्षात कोणालाच भेटलो नाहीये.” डॉ. आनंद वैशंपायन
“ पण आनंद मला तुझ्या प्रोजेक्ट मध्ये वगैरे अजिबात इंटरेस्ट नाहीये. दोन वर्ष एकटी राहून मी कंटाळले आहे. मला आता घटस्फोट हवा आहे.”
“अरेरे, आय फील सॉरी...” प्रोफेसर ब्रिज
“ हे पहा. तुम्ही जे कोणी असाल. प्लीज माइंड योर ओन बिजनेस.” नेहा.
“ नेहा. आपण जर हा प्रॉब्लेम घरी जाऊन सोल्व केला तर बरं होईल असं मला वाटतं.” डॉक्टर वैशंपायन समजावणीच्या सुरात नेहाला म्हणाले.
“ घरी जाण्यासाठी वेळ आहे का तुमच्याकडे?” नेहा वैतागून म्हणाली.
” होय माझं प्रोजेक्ट पूर्ण झालं आहे. मी अगदी या क्षणी तुझ्याबरोबर घरी येऊ शकतो.” डॉक्टर वैशंपायन नेहाचा हात हातात घेऊन म्हणाले.
मग ते प्रोफेसर ब्रिज यांच्याकडे पाहून म्हणाले
“प्रोफेसर. माझ्या अनुपस्थितीमध्ये आपण चार्ज सांभाळू शकाल का?”
“ येस येस श्योर व्हाय नॉट... तुम्ही निश्चिंतपणे घरी जा ”