संपूर्ण प्रोजेक्टचा चार्ज घेणे प्रोफेसर ब्रिज  यांना चांगलेच महागात पडले होते.

कारण दुसरयाच दिवशी जेव्हा ते प्रयोगशाळेत पोहोचले तेव्हा गौतमचे आक्रसलेले शरीर सूक्ष्म शरीर बनविण्याच्या मशिनच्या  मधोमध पडले होते.

अतिशय कमी वेळात तिकडे गर्दी देखील गोळा झाली होती. डॉक्टर आनंद वैशंपायन यांना फोन करून तातडीने बोलावून घेण्यात आले होते.  

“ असं दिसतंय कि याने रात्री आपले सूक्ष्म शरीर बनवण्याचा प्रयत्न केला आणि काहीतरी गडबड झाली.” प्रोफेसर ब्रिज

“ मशीन तर पूर्णपणे नादुरुस्त आहे. त्यामुळे असे झाले असेल असे वाटत नाही.” डॉक्टर वैशंपायन म्हणाले.

प्रोफेसर ब्रिज  मृत शरीराचे निरीक्षण करत होते.

“ मला एक समजत नाही कि रात्रीच्या पोटात हा शंकेखोर गौतम या मशीनचा वापर करायला असं गुपचूप का बरं आला असेल? काही करायचं होतं तर आपल्या समोर करायला हवं होतं.”

डॉक्टर वैशंपायन बुचकळ्यात पडले होते.

“ आता काय उपयोग? हा तर मेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकत नाही.” विनय म्हणाला.  

“ उत्तर मिळू शकेल. हे मशीनच आपल्याला हे उत्तर सांगेल.” प्रोफेसर ब्रिज  म्हणाले.

‘‘कसे काय?’’ डॉक्टर वैशंपायन यांनी अधीरपणे विचारले. 

“ डॉक्टर, तुम्हाला माहित असेलच कि या मशीन मध्ये एक ब्लैक बॉक्स सुद्धा आहे जो सूक्ष्म शरीरद्वारे पाहिलेली सर्व चित्रे रेकोर्ड करून ठेवतो.

त्यातली मेमरी डिस्क काढून कम्प्युटर मध्ये बघा. गौतमच्या सूक्ष्म शरीराने मारण्याआधी नक्की काय पहिले असेल?” प्रोफेसर

‘‘ठीक आहे.” डॉक्टर वैशंपायन ब्लैक बॉक्स मधून मेमरी डिस्क बाहेर काढू लागले.  काही सेकंदातच त्यांनी मेमरी डिस्क काढून कम्प्युटरला कनेक्ट केली. आता स्क्रीनवर गौतमच्या सूक्ष्म शरीराच्या हालचाली पाहत होते. गौतमचे सूक्ष्म शरीर निर्माण झाले होते.

“ अरे हा तर प्रयोगशाळेच्या बाहेर जायचा प्रयत्न करतोय.” विनय

मग त्यांना दिसले कि गौतमचे सूक्ष्म शरीर एका रस्त्यावर चालत होते.

“ हा नक्की कुठे जातोय..” डॉक्टर

“ रस्ता तर ओळखीचा वाटतोय...” विनय 

“ अर्थात हे इथलेच रस्ते आहेत.” डॉक्टर

“ हो पण हा रस्ता तर माझ्या घराच्या दिशेला जातो. अरे आता तर हा माझ्या घरात प्रवेश करतोय...” डॉक्टर वैशंपायन हैराण होऊन पाहत होते.

काही क्षणातच दिसले कि ते गौतमचे सूक्ष्म शरीर नेहा म्हणजे मिसेस वैशंपायन यांच्या शरीराभोवती घिरट्या घालत होतं आणि नंतर ते सूक्ष्म शरीर नेहाच्या शरीरात विलीन झालं.

त्याच क्षणी स्क्रीनवर वीज चमकल्यासारखे झाले आणि स्क्रीन पुढच्या क्षणी काळी झाली होती.  

डॉक्टर वैशंपायन यांनी पुढे जाऊन सगळी बटणं दाबली पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.

“ राहू दे. मेमरी डिस्क मध्ये पुढे काहीच रेकोर्ड झाले नाहीये.” प्रोफेसर ब्रिज  यांनी डॉक्टर वैशंपायन यांना अडवले.

“ म्हणजे? पुढे काय झालं याचं उत्तर आपल्या कडे नाही? हि मेमरी डिस्क पुढे काहीच सांगू शकत नाही?” डॉक्टर

“ मला वाटतं कि मेमरी डिस्क बरंच काही सांगू शकते.” प्रोफेसर

“ ते कसं काय?” डॉक्टर

“ आता निश्चित काही सांगू शकत नाही. परंतु सर्व सिन्स पुन्हा एकदा सिक्वेन्स मध्ये पाहावे लागतील. थोडी चौकशी देखील करावी लागेल. तर काहीतरी नक्की सांगता येईल.”

प्रोफेसर ब्रिज  गौतमच्या प्रेताभोवती फेऱ्या मारत बोलत होते.


 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel