वर्ष २०६१

खोलीत भयाण शांतता पसरली होती. सगळं काही थांबल्यासारखं वाटत होतं.

खोलीच्या रिकाम्या भिंतींमधली पोकळी त्यांच्या श्वासोच्छवासाच्या आवाजाने भारली होती.

मिसेस मेहता शक्तीला त्याला नक्की कोणती गोष्ट काय त्रास देत आहे हे विचारण्याआधीच तो म्हणाला,

“मी वर्ष २०४० मध्ये सर्व काही घडताना पाहिले आहे आणि म्हणून मला माहित आहे की

यापूर्वी असे काहीही घडले नव्हते भविष्यात कधीही होणार नाही.

तेच अंतिम सत्य आहे. तो मृत्यू आणि विनाशाच्या देवतांसाठी एक अजेय आव्हान देखील आहे.”

"हे कसं शक्य आहे? तू म्हणतोस तू जन्मापूर्वी गोष्टी पाहिल्या आहेस? हे अशक्य आहे."

७९ वर्षांच्या श्रीमती मेहता उत्साहाने म्हणाल्या. २०६१   मध्ये २० वर्षाचा मुलगा २०४० मध्ये घडलेली घटना कशी पाहू शकतो याचे त्यांना आश्चर्य वाटले!

“तुमचे म्हणणे बरोबर आहे. तेव्हा माझा जन्म झाला नव्हता, पण मी त्या बित्रा आयलंडच्या प्रयोगशाळेमध्ये एकापेक्षा अधिक विविध स्वरूपात उपस्थित होतो.

मला आजही सर्व काही आठवतय, जणू काही मी तिथेच आहे आणि सर्व काही माझ्या डोळ्यासमोर घडत आहे!”

शक्ती म्हणाला.

शक्तीकडे एकटक पाहत त्या पुन्हा बोलू लागल्या,

“गेल्या काही वर्षांत मी अनेक अविश्वसनीय घटना आणि रहस्यमय गोष्टी पाहिल्या आहेत. अशा काही गोष्टी आहेत ज्यांची विज्ञानाकडेही उत्तरे नाहीत.

आणि म्हणूनच मला असे मान्य करणे अनिवार्य आहे की काही सत्य आणि रहस्य आहेत जी माझ्यासारख्या सामान्य मनाच्या आणि बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहेत.”

डोळ्यातील अश्रू पुसत पुढे त्या म्हणाल्या,

“मला सामान्य माणसासारखे सामान्य जीवन जगायचे होते आणि शांतपणे मरायचे होते.

२०४० मध्ये माझा सामान्य आणि समाधानकारक मृत्यू शक्य होता,

तेव्हा सर्व काही चांगले होते. मी आनंदाने मरावे अशी माझी इच्छा होती ! पण सर्व काही बदलले. ”

मिसेस मेहता यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.

शक्ती त्यांना सावरायला वेळ देत शांत राहिला. बराच वेळ थांबून मिसेस मेहता म्हणाल्या,

" तेव्हाही मला या भानगडीत पडायचं नव्हतं ना मला आताही या सगळ्याचा भाग व्हायचं आहे, तू इथे का आलास?"

"कारण मी अजूनही त्या व्यक्तीला शोधत आहे आणि तूम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहिलेल्या शेवटच्या आहात.."

शक्तीने आशायुक्त नजरेने उत्तर दिले

मिसेस मेहता शक्तीच्या डोळ्यात पाहून म्हणाल्या,

“त्या मोहिमेत मी सर्व काही गमावले आणि मला हे देखील माहित नाही की कसे आणि का? होय, मी त्या व्यक्तीला पाहिले आहे.

पण मला अजूनही माहित नाही की ती व्यक्ती नक्की कोण होती?

तू देखील त्या बेटावर होतास असे म्हणालास, तर मला सांगा, २०४० मध्ये त्या बेटावर काय झाले? तू म्हणालास,

तू त्या व्यक्तीला शोधत आहेस. त्यावेळी ती व्यक्ती ही त्या बेटावर होती. ती कोण होती हे तुला माहीत असेलच?

तुला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? मला सांग."

मिसेस मेहता यांनी खोदून खोदून विचारले. शक्ती काही क्षण मिसेस मेहतांकडे पाहत राहिला, मग शेवटी त्याने विचारले,

"मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली तर, तुम्हाला माहीत असलेल्या सर्व गोष्टी मला सांगाल का?"

“मी वचन देते की मी काहीही लपवणार नाही... फक्त मला सांग, २०४० मध्ये असे काय घडले ज्यामुळे माझ्या मृत्यूची वेळ बदलली?

माझ्यासोबत असे का झाले आणि यासाठी माझी निवड का झाली हे जाणून घेतल्याशिवाय मला मरायचे नाही?"

शक्ती मिसेस मेहता यांच्या त्या वृद्ध आणि आशाळभूत डोळ्यांकडे पाहत होता.

त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे तो त्यांना सांगू लागला….

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel