Bookstruck

मुलगा आणि पोपट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एका मुलाने पिंजर्‍यात एक पोपट पाळला होता. एके दिवशी पिंजर्‍याचे दार उघडे राहिले असता तो पोपट बाहेर पडला व उडून जाऊ लागला. त्याला पकडण्याचा त्या मुलाने बराच प्रयत्‍न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग तो पोपटाला म्हणाला, 'अरे, तू जात असलास तर खुशाल जा. चांगला पश्चात्ताप झाल्याशिवाय तुझे डोळे उघडणार नाहीत. तू कुठेही गेलास तरी, इथल्यासारखं सुख तुला दुसरीकडं मिळणार नाही.' पोपट त्यावर म्हणाला, 'मला सुख मिळो अगर न मिळो, पण एवढं नक्की की यापुढे मला तुझ्या मताप्रमाणे वागावं लागणार नाही, माझ्या मनाला वाटेल त्याप्रमाणे मी वागू शकेन.'

तात्पर्य

- पारतंत्र्यातल्या मोठ्या सुखापेक्षा स्वातंत्र्यातले थोडे सुखसुद्धा श्रेष्ठ होय.

« PreviousChapter ListNext »