एकदा प्राणी व पक्षी यांची लढाई सुरू झाली असता सिंहाने असा हुकूम काढला की, 'सर्व प्राण्यांनी एका विशिष्ट वेळी लढाईच्या तयारीने एकत्र जमावे, हा हुकूम न मानणार्याला भयंकर शिक्षा केली जाईल.' या हुकूमाप्रमाणे जे प्राणी जमा झाले, त्यात गाढव व ससेच फार होते. त्यांना पाहून काही सेनापतींचे मत असे पडले की, ते लढाईच्या कामाला निरुपयोगी असल्यामुळे त्यांना कायमची रजा द्यावी. पण हे मत सिंहाने मान्य केले नाही. तो म्हणाला, 'अशी चूक करू नका. कारण ही गाढवे रणशिंगे वाजविण्याचे काम चांगले करतील व पत्रे पोहचविण्याचे काम सशांना सहज करता येईल.'
तात्पर्य
- प्रत्येकाचा काहीना काही उपयोग आहेच. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.