एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी ? वसंतऋतूत गाणारी कोकीळा व हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसं जमत नाही तर भिकारी सूर काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस ?' भुंगा म्हणाला, 'अग चिमणे, परमेश्वरानं या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणं हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय ? जेव्हा कोकिळेचं गाणं बंद पडतं किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्यासारख्या गरीबाचा उपयोग होतो.'

तात्पर्य - सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel