थंडीच्या दिवसात एका गाढवाला वाटले की उघडी हवा व वाळलेला कडबा यांच्याऐवजी थोडीशी उष्णता व घासभर ताजे गवत आपल्याला मिळाले तर फार बरे होईल. ही त्याची इच्छा लवकरच पूर्ण झाली. पण त्याबरोबर कामही वाढले व त्यामुळे उन्हाळ्याप्रमाणेच थंडीचाही कंटाळा आला व पावसाळा आला तर बरे असे वाटू लागले. लवकरच पावसाळा आला व पुढे येणार्‍या हिवाळ्याचे सामान वाहून नेण्याचे त्याला श्रम पडू लागले. शेवटी आता हिवाळा येईल तर बरे असे त्याला वाटू लागले.

तात्पर्य

- अतृप्त माणसाचे समाधान क्वचितच होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel