केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??

कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
कधी एखाद्या निराधार बालकाचा
पालक होऊन बघ
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ

एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !!

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच
मस्तक सशक्त होत.....
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत....
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसत...!

शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?

शाळेत आज मुलांना बसायला
साधी फरशी नाही
मंदिराला मात्र संगमरवरी ?

शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही......
आपला भारत नक्की महासत्ता होणार ?

पायात घालायची चप्पल ए सी मधे विकायला ठेवतात आणि
भाजीपाला फूटपाथवर.....
म्हणे आमचा देश कृषी प्रधान
आणि आत्महत्या करतो शेतकरी...
शेकडो मैल चालतो वारकरी...

अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..! ....

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel