सुखांमागे धावता धावता, विवेक पडतो
गहाण
पाण्यात राहूनही माशाची मग भागत
नाही तहान
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक
होते खूप
वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडत
तूप
बायको आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू
नका वेळ...
करिअर होतं जीवन,मात्र जगायचं
जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती,
पैसा छापणारं यंत्र
चुकून सुट्टी घेतलीच तरी, पाहुणा
'स्वतःच्या घरी'
दोन दिवस कौतुक होतं, नंतर
डोकेदुखी सारी
मुलच मग विचारू लागतात, बाबा
अजून का हो घरी?
त्यांचाही दोष नसतो,त्यांना याची
सवयच नसते मुळी
सोनेरी वेली वाढत जातात, घरा भोवती
चढलेल्या,
आतून मात्र मातीच्या भिंती, कधीही न
सारवलेल्या
आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम
जाणवू लागतं काही,
धावण्याच्या हट्टापायी आपण श्वासच
मुळी घेतला नाही...
सगळं काही पाहता पाहता,
आरशात पाहणं राहून गेलं,
सुखाची तहान भागवता भागवता,
समाधान दूर वाहून गेलं...
थंड पाणी आणि
गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील
चिंता घालवतात...
आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो
पण माथ्या आड गेलेला "जिवलग"
परत कधीच दिसत नाही..
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना
ह्रदयात साठवून ठेवा...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel