निर्मितीचे स्तंभ भाग २
अर्जुन ने किलो ला इतर सर्वाना उठविण्याचे आदेश दिले. सर्व प्रथम डॉक्टर रेणू उठणार होती आणि ती एकदा नवीन परिस्तिथीला समायोजित झाली कि इतर सर्वाना उठविण्याचा प्रोटोकॉल होता. "कॅप्टन ! येलिअन भेटले कि नवीन पृथ्वी. आणि हे काय यानावर हल्ला बिल्ला झाला कि काय ? " रेणू येतानाच बोलली. शीत निद्रेतून बाहेर येणे तिच्या साठी नवीन नव्हते. आत्ताच स्नान करून आल्या प्रमाणे तिचा चेहेरा चमकत होता. त्या स्तिथीत सुद्धा अर्जुन ला हसू आले. "हल्ला झाला असेल तर डॉक्टर साहिबा ह्या बाथ रोब मध्येच का लढणार आहे?" अर्जुन ने मिश्किल पाने म्हटले. "वा, शेकडो वर्षे झाली तरी कप्तान साहेबाना म्हजे कपडेच लक्षांत आले का ? " रेणू सुद्धा त्यांच्या मस्करीत सहभागी झाली. "You never know. कदाचित तू ह्या विश्वांतील शेवटची स्त्री आहेस." कॅप्टन अर्जुन ने तिला शेवटचा धक्का दिला.
"म्हणजे ?"
"आम्ही पृथ्वी पासून शेकडो प्रकाश वर्षे दूर आहोत, कदाचित लाखो वर्षापासून आम्ही शीत निद्रेत आहोत. आता एक शेवटच्या ग्रहाकडे पोचलो आहोत. बहुतेक आम्हाला आमचे संपूर्ण आयुष आता त्या ग्रह भोवतीच जगावे लागेल. "
रेणू थोडीशी कावरी बावरी झाली. ह्या मिशन वर जाताना मृत्यू येयील से सर्वानीच गृहीत धरले होते, पण अश्या प्रकारे निराश होवून जगावे लागेल असे मात्र त्यांना वाटले नव्हते.
काही वेळाने ग्रेस आणि रामान सुद्धा शीत निद्रेतून बाहेर आले. सर्वांत मोठा धक्का रामान साठी होता. कारण यांनाचे बहुतेक यंत्र निकामी झाले होते. मला बिचार्याला कामच उरले नाही असे म्हणून रामान मट्ट करून खाली बसला. माझी सर्व औषधें खराब झाली आहेत रेणूने घोषणा केली.
हळू हळू वेळ जावू लागला. आठवड्या भरांत सर्व टीमला अनेक गोष्टींचा अंदाज आला. यानाचे बहुतेक अवयव खराब झाले होते. फक्त मुख्य आण्विक उर्जास्रोत चालत होता आणि आणखीन अनेक वर्षे चालेल अश्या स्थितीत होता. शस्त्रागार पूर्णपणे नष्ट झाले होते आणि किलोने यानाचा तो भाग सील केला होता. ज्या भागांत बीजांडे आणि शुक्राणू शीतग्रहांत ठेवले होते तो भाग कसा बस चालू होता पण तिकडे उजेड अजिबात नव्हता कारण किलोने त्या भागातील LED दिवे काढून दुसरीकडे वापरले होते. अभियांत्रिकी कक्षांत तर अंधाधुंडी होती. किलोने जवळ जवळ सर्वे यंत्रे आणि भाग वापरून काढले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किलोने आपल्या मदतीसती चक्क एक दुसरा यंत्रमानव बनवला होता. त्याला किलो प्रमाणे बुद्धी नसली तरी किलो त्याला आज्ञा देवून काम करवून घेवू शकत होता.
रामन ने आपला जीव धोक्यांत घालून आण्विक प्रकल्पाचे रेडियेशन लेवल मोजले आणि त्या नुसार आपण सुमारे १९५ हजार वर्षे प्रवास करत होतो असा निष्कर्ष काढला.
किलोने ह्या वर्षांत अनेक गंभीर आणि मानवाला सतावत असलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधून काढले होते. P = NP ? सर्वांत मोठा अविभाज्य अंक इत्यादी अनेक प्रश्नी उत्तरे किलो जवळ होती.
२२ दिवसांत किलोने यान कृष्ण ग्रहाच्या कक्षेत टाकले. दुर्बिणीने ग्रह आता थोडा स्पष्ट दिसत होता. ग्रहाला कुठलाही तर नसल्याने उर्जेचा स्त्रोत काय असावा हा प्रश्न होता, पण दुर्बिणीने हे लक्षांत आले कि ग्रहा च्या दुसर्या बाजूला एक प्रचंड मोठा ज्वालामुखी आहे, त्याच्या मुळे ग्रहाचे तापमान सुमारे १४ ते ३३ सेन्तीग्रेड असेल असा कयास रामान ने लावला. पण त्या जीवाचे काय जो किलोला दिसला होता ? किलोच्या अनुमाना प्रमाणे तो जीव अजून एकाच जागी स्थिर होता आणि त्यामुळे तो जीव असण्याची शक्यता अंधुक होती. त्या शिवाय त्या ग्रहावर उजेड कसा असेल हा सुद्धा प्रश्न होता.
२४ दिवस घिरट्या घातल्या नंतर यान ग्रहावर उतरण्यास सिद्ध झाले. आता सर्वांनाच ग्रहाचा अंदाज आला होता. ज्वालामुखीमुळे गरमी होती त्याच वेळी संपूर्ण ग्रहावर जागोजागी सतत वीज चमकत होती त्यामुळे थोडाफार प्रकाश सुद्धा होता. अर्थांत पृथ्वी पेक्षा फारच कमी आणि झाडे वाढण्यासाठी अजिबात पुरेसा नव्हता. कडाडनार्या विजेपासून वाचत वाचत यान कसे बसे खाली उतरले. अपेक्षे प्रमाणे यांचे बाहेरील पाय मोडले होते. त्यामुळे पुन्हा उड्डाण घेणे शक्य नव्हते.
ग्रेस आणि रेणू बाहेर जाण्याची तयारी करत होती. ग्रहाच्या जमिनीवर चालण्यास किलो सक्षम नव्हता पण त्याचा दुसरा यंत्रमानव ग्राम मात्र बाहेर येवू शकत होता. "जीवा पासून आम्ही सुमारे १२० मैल दूर आहोत. आम्हाला इतके अंतर पायीच काढावे लागेल. सर्वप्रथम रेणू आणि ग्रेस बाहेर जावून ग्रहाच्या वातावरणचा अभ्यास करतील त्या नंतर आम्ही अन्न पाणी आणि ग्राम घेवून बाहेर निघू. १२० मैल चालण्यासाठी आम्ही ६० तास घेवू आणि झोपण्यासाठी आणखीन २० तास म्हणजे ४ दिवसांत आम्ही तिथे पोचू. किलो आणि रामान यानात थांबून आम्हाला मार्गदर्शन करतील" अर्जुन ने आपला प्लान सांगितला.
ग्रेस आणि रेणू ने यानातून बाहेर उडी घेतली. इतर जन आतुरतेने त्यांच्या कडे यानातून पाहत होते.
गुरुत्वाकर्षण - ८.९ म्हणजे पृथ्वीपेक्षा थोडे कमीच.
प्राणवायू - ४४ टक्के म्हणजे पृथ्वीपेक्षा दुप्पट
हवेचा दबाव - पृथ्वीपेक्षा थोडा कमी पण जगण्यासाठी पुरेसा.
त्या शिवाय हवामानात ओझोन आणि नेत्रवायू मुबलक प्रमाणात आहे.
बाहेर जीव जंतू आहेत कि नाही हे सांगणे शक्य नाही कारण माझी यंत्रे मोडली आहेत.
रेणू रेदिओ वर माहिती देत होती. "इतर जीवांचे ठावूक नाही पण आम्ही तरी किमान स्पेस सुट न घालता बाहेर जावू शकू." रेणूने आपला शेवटचा रेपोर्त दिला.
ग्रेस ने यांच्या चारी बाजूंची टेहळणी केली.
"कुठल्याही प्रकारची हालचाल इथे आहे असे वाटत नाही. जागो जग वीज पडल्याचे मात्र निशाण आहे. आकाशांत प्रंच मोड्या विजा आवाज न करता चमकत आहेत आणि त्यांच्या मुळे सर्वत्र सावल्यांचा भयानक खेळ चालू आहे त्यामुळे काही हालचाल असली तरी आम्हाला ती लक्षांत येणे मुश्ल्कील आहे. आमचे यान आता हळू शकत नसले तरी सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चुकीच्या जागि आहोत आम्हाला higher ground घ्ययला पाहिजे होता पण आम्ही सध्या सपाट प्रदेशांत आहोत."
ग्रेस ने सल्ला दिला कि यांच्या चारी बाजूला मोठे बल्ब लावून उजेड टाकावा जेणे करून यान दुरुन सुद्धा त्यंना स्पष्ट दिसेल. त्या शिवाय विजेच्या तारांचे एक कुंपण सुद्धा चारी बाजून टाकण्याचे काम त्याने हाती घेतले. ग्राम आणि ग्रेस ने ६ तासांत कुंपण तयार केले. रेणू यानात येवून अन्न पाणी गोळा करण्याचे काम करू लागली.
एक मस्त पैकी झोप काढून वाटचाल करण्यास सिद्ध झाले. "गुड लक सर " किलोने शुभेच्छा दिल्या. सर्वांनी स्पेस सुत घातला होता पण प्राण वायू मात्र बाहेरील हवेतूनच ते मिळवत होते. ग्राम सर्व वजन घेवून चालत होता. रामन यानातून त्यांची वाटचाल पाहत होता आणि मार्गदर्शन देत होता. अर्जुन ने आकाशांत पाहिले, सगळी कडे अनेक विजा चमकत होत्या, त्यांचा सावल्या त्या मुले अजब नाचत होत्या, जणू काही भगवान शिवाने तांडव नृत्य सुरु केले आहे असाच देखावा होता. आपल्या विचारावर त्याला हसू आले. पृथ्वी सारख्या तुच्छ् ग्रहावर कुणीतरी तांडव नृत्याची कल्पना केली पण जगाच्या एका अनजान कोपर्यांत सुद्धा ती लागू पडली, मानवी कल्पना शक्ती खरोखरच गजब आहे असे त्याला वाटले.
ग्रेस सर्वांत पुढे चालत होता त्याचा मागे ग्राम नंतर रेणू आणि सर्वांत शेवटी होता अर्जुन. मिथेन, प्राणवायू आणि गरमी, जीवनास पोषक असे तीन घटक होते, कमतरता होती तर ती फक्त पाण्याची. पण मिथेन जळतो तिथे पाणी निर्माण हमखास होते, मग हे पाणी जाते कुठे ? तो विचार करत होता. रामनला त्याने बोलून सांगितले.
रामन ने सुद्धा त्याच विषयावर लक्ष केंद्रित केले होते. "ग्रहावर पाणी आहे कि नाही हे फक्त डोळ्यांनी पाहूनच समजेल सर कारण इतर काहीही उपकरण सध्या आमच्याकडे नाही." रामन ने सांगितले.
बराच वेळ सर्व मंडळी काहीही न बोलत चालत होती. ह ग्रह भेटला नसता तर आपण की केले असते हाच विचार अर्जुन करत होता. मागे पृथ्वीवर आमच्या बद्द्ल काय लिहिले असेल, इत्यादी इत्यादी अनेक विचार त्याच्या डोक्यांत घिरट्या घालत होते. किती तास ते चालत होते ह्याला काहीही मर्यादा नव्हती. आणखीन दोन दिवस ते सतत चालत होत. त्यांच्या नशिबाने ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने जास्त त्रास न घेता ते वेगाने चालू शकत होते. '
सपाट प्रदेश आता जावून चढण लागली होती. ग्रेस हळू हळू वाट काढत चालत होता तर ग्राम मध्ये मध्ये अडकत होता. रेणू ग्राम च्या मदतीला त्याचा बरोबर चालत होती. अर्जुन मात्र फार दूर होता. मध्ये मध्ये दुर्बिणीने तो दूर पाहत होता. सावल्यामुळे सगळीकडेच गोष्टी हलत आहेत असा भास सतत त्याला होत होता.
अचानक दुरून त्याला ग्रेस थांबला असल्याचे दिसले. "Code Stealth" ग्रेस चा आवाज रदिओवर ऐकू आला. अर्जुने विचार न करता तत्काळ जवळच्या एका दगडाकडे धाव घेतली रेणू सुद्धा जमिनीवर झोपून लपली. ग्राम ला Code Stealth चा अर्थ ठावूक नव्हता पण किलोने त्याला वाकविण्याची अज्ञ दिली.
कोड स्तेल्थ म्हणजे सर्वांनी लपणे असा अर्थ होता. म्हणजे ग्रेस ला काहीतरी धोका जाणवला होता. रेडियो वरून ग्रेसने अर्जुनला जवळ येण्यास सांगितले. अर्जुन लपत छापत ग्रेस जवळ गेला ग्रेस जिथे होता तेथून एक दूर वरचे पठार दिसत होते विजांच्या खेळांत शपथ काहीही दिसत नसले तरी ग्रेसने त्याला आपली दुर्बीण दिली. ग्रेस च्या दुर्बिणीला इन्फ्रा रेड होते. बराच वेळ पहिल्या नंतर अर्जुन थक्क झाला. "Base स्टेशन टू Team, आपण सगळे ठीक आहात काय ? ओवर" रामान रादियो वरून विचारात होता. दूर रेणू अजून सुद्धा जमिनीवर रांगत होती.
"कप्तान टु बेस स्टेशन, आम्हाला एक मानव निर्मित किंवा एलियन निर्मित वस्तू दिसत आहे. दुरून पाहता एक केबिन असावे असे वाटत आहे कदाचित चौकोनी आकाराचा दगड सुद्धा असेल पण त्याच्यावर एक अन्तीना प्रमाणे तबकडी सुद्धा दिसत आहे. ओवर"
रेदिओ वर काही क्षण शांतता पसरली. नंतर सर्वानीच एका मेकाना शुभेच्चा दिल्या.
"आम्ही इथेच मुक्काम करून ह्या जागेवर निरीक्षण करावे असा माझा सल्ला आहे. किमान २४ तास तरी आम्ही हालचाल दिसते कि नाही हे पाहिलं पाहिजे नंतरच तिथे जायचे कि नाही ह्याचा निर्णय करता येयील. " ग्रेस ने सल्ला दिला आणि अर्जुन ने तो तत्काळ मान्य सुद्धा केला. त्याला कहीही रिस्क घ्यायची नव्हती.
पुढील २४ तास त्या अनोळखी ग्रावरील एका भन्नाट केबिन वर ते आलटून पालटून पाळत ठेवून राहिले.
क्रमश:
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.