२४ तास पळत ठेवून सुद्धा चमूला काहीही हालचाल दिसली नाही. दूरवर असलेले ते केबिन झपाटलेल्या वाड्या प्रमाणे वाटत होते. अर्जुन ने जागतिक साहित्याचा अभ्यास केला होता, एके काळी जगांत भयकथा, भुते अश्या विषयांचे भय लोकांच्या मनात होते. महामारीचे आगमन झाल्यानंतर मात्र लोकांचा दृष्टीकोन पूर्णतः बदलला, मानवी मासावर जगणारी भुते जावून त्याजागी महामारी स्वरूपी मृत्यूने जागा घेतली. काहीच्या मते महामारी म्हणजे बायबल मधील "horseman of apocalypso" होते तर काहीच्या मते साक्षांत काळ मानवाला ग्रहण करण्यासाठी धरतीवर अवतरला होता, अवघ्या १०० वर्षांत महामारीने जगाचे कॅल्चर बदलून टाकले.
सध्या च्या परिस्थितीत अर्जुनला ज्या प्रकारचे भय वाटत होते त्याच प्रकारचे भय कदाचित आपल्या पूर्वजांना वाटत असले पाहिजे असे त्याला वाटले. अर्थांत, इतक्या वर्षांत पूर्वज काय पण संपूर्ण मानव वंश इतिहास बनून राहिला असण्याची शक्यता होती. जेंव्हा मानव नाही तर त्याच्या मेंदूत अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया ज्या "भय" हि भावना निर्माण करतात ती सुद्धा पूर्ण पणे निरर्थक होती.
अर्जुनच्या विचारांत भंग पडला जेंव्हा ग्रेस ने पुढे जाण्याची खूण केली. अर्जुन आणि ग्रेस केबिन च्या दिशेने हळू हळू चालू लागले. विश्वाच्या कुठल्या तरी कोपर्यांत मानवी वंश चालू राहावा असा त्यांच्या मोहिमेचा उद्देश होता. जीवनास पूरक असा ग्रह सापडला असता तर सर्व मानवी सभ्यतेसाठी ती एक यशोगाथा ठरली असती. २०० वर्षां पासून नासा, स्पेसX, इस्रो, SSP, ब्लू ओरिजिन, Third enterprise इत्यादी कंपन्यांनी कित्येक मानवी साक्षेप परग्रहवासीयांच्या शोधांत घालवले होते. आज त्यांना एका ग्रहावर एक केबिन सापडले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते.
ग्रेस आणि अर्जुन ने प्रोटोकोल प्रमाणे केबिन चे चारी बाजूने निरीक्षण केले. केबिन दोन मजली होते. फार जुने वाटत होते आणि बाहेरून ते लाकडी असेल असे वाटत होते, केबिन च्या बाहेर काही यंत्रे विखरून पडली होती. ह्या ग्रहावर दिशा ही संकल्पना नव्हती म्हणून त्यांनी ज्या बाजूला रेणू होती त्या बाजूला उत्तर असे ठरवले. त्या न्यायाने केबिन च्या दक्षिण दिशेला एक ५ फूट लांबीचा टॉवर होता. कदाचित तो अन्तीना प्रमाणे काम करत असावा असे अर्जुनला वाटले.
ग्रेस ने बारकाईने त्या टॉवरचा अभ्यास केला. टॉवर च्या बाजूला एक छोटे बटन होते, ग्रेस ने ते दाबले. काही क्षण काहीही झाले नाही. पण काही वेळ थांबल्या नंतर बारीक सा आवाज येवून टॉवरच्या दुसर्या बाजूच्या भोकांतून थोडे पाणी बाहेर आले. पाण्याचे घनफळ कमी असले तर ते पाणी होते हेच पाहून अर्जुनच्या मनाला फार समाधान लाभले. ह्या असल्या भयानक ग्रहावर पाणी भेटावे हि फारच चमत्कारिक गोष्ट होती.
पाणी भेटल्याची बातमी ऐकून रामन आणि रेणूला सुद्धा प्रचंड आनंद झाला. आता केबिन मध्ये आंत एक खानावळ सापडली तर आम्ही सगळे मेलो असून स्वर्गांत आलो आहोत असे समजण्यास हरकत नाही अस विनोद रामन ने केला. ह्या क्षणी केबिन मध्ये आंत काय असेल हे अर्जुनला फक्त एक गूढ होते.
केबिन एखाद्या मोठ्या घर एवढे मोठे होते. दर अगदी स्पष्ट होते, खिडक्या दिसत नव्हत्या पण भिंतीना छोट्या फटी जरून होत्या. अंतून उजेड किंवा आवाज अजिबात येत नव्हता. ग्रेस ने आधी दार ठोठावले पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही.
शेवटी अर्जुनच्या परवानगीने ग्रेसने दर हळूच ढकलून दिले आणि तो अंत गेला. दर ढकलल्या नंतर ते प्रत्यक्षांत जवळ जवळ लाकडाचेच होते हे दोघांच्या लक्षांत आले. दार धुळीने माखले होते आणि उघडतांच धुळीचा ढग हवेंत उडाला. अर्जुन ग्रेस च्या मागे अंत गेला. "काय आहे आंत " रेणूने अधीरतेने रेडियो वर विचारले.
दोघांना आंत विशेष असे काहीच सापडले नाही, अनेक वायर्स, कसली तरी जवळ जवळ मोडकी यंत्रे, सर्वां वर धूळ, काही कपाटे ज्यांची दारे मोडून गेली होती, असाच कचरा आंतील खोलींत होता. ग्रेस आणि अर्जुन ने काही यंत्रावर भाषा कसली आहे हे वाचण्याचा पर्यंत केला पण त्यांच्या वर भाषा आहे, कि नक्षी आहे के ओरखडे आहेत हे काहीही समजले नाही.
"In the middle of nowhere !" ग्रेस पुटपुटला. दुसर्या खोलींत सुद्धा त्याच प्रकारचा कचरा होता पण मध्य भागी एक टेबल होते आणि टेबल वर एक ओंडका होता. ग्रेसने जवळ जावून त्याच्या वरची धूळ साफ केली. "लाकूड आहे का?" अर्जुन ने विचारले. "नाही, पण हे हाड असावे असे वाटते" ग्रेस ने उत्तर दिले. "प्राणी नक्कीच आमच्या डायनोसोर प्रमाणे भव्य असावा." अर्जुन ने रेडियो द्वारे इतरांना माहिती दिली. "मी येवू का तिथे ?" रेणूने विचारले पण अर्जुने तिला आहे तिथेच थांबण्यास सांगितले.
तिसर्या रूम ची ग्रेस ने टेहळणी सुरु केली पण हाताने त्याने अर्जुनला सावध राहण्याचा इशारा केला. अर्जुन आणि ग्रेसने दराच्या बाहेरल दबा दिला. अर्जुन ने आंत डोकावून पहिले. तिसरा रूम जवळ जवळ रिकामी होता. पण एका बाजूला एक मोठे कपात होते आणि त्यांत शेकडो पुस्तकें ठेवलेली दिसत होती. त्याच्या पुढे एक फार मोठी आराम खुर्ची होती, लाल रंगाची असावी बहुतेक पण त्यावर धूळ माजली होती. खुर्चीत माणसा सारखा दिसणारा प्राणी होता, प्राणी काय माणूसच दिसत होता.
अर्थांत माणूस जिवंत आहे कि फक्त त्याचे शव आहे हे समजण्यास मार्ग नव्हता. खुर्ची प्रमाणे त्याच्यावर सुद्धा धूळ बसली होती पण कुजण्याची काही खून वाटत नव्हती.
"आह , पण इथे कुजण्या साठी बक्तेरिया कुठे असतील?" अर्जुन ला वाटले. ते एक शव आहे ह्यांत काही संशय नव्हता पण त्याच्या प्रोटोकोल प्रमाणे काहीही धोका पत्करायची त्यांची तयारी नव्हती. ग्रेस ने एक नजर त्या शवावर ठेवली आणि अर्जुन ने हळुवार रूम मध्ये प्रवेश कारत चारी बाजूना टेहळणी केली. कपाटांत प्रत्यक्षांत वह्या ठेवल्या होत्या. अर्जुन ने एक वही काढून वाचण्याचा पर्यंत केला पण त्यावर असलेली भाषा त्याला समजत नव्हती. अर्जुन आणि ग्रेस त्या शवाच्या जवळ आले.
त्यांनी त्याचा चेहरा निरखायला सुरुवात केली. ह्या एलियनचा चेहरा माणसा सारखा आहे हे त्यांना चांगले वाटले, त्याच जागी जर एखादा हिरव्या रंगाचा दोन डोके वाला प्राणी असता तर ते कदाचित इतके जवळ गेले सुद्धा नसते.
दोघे जन शवचा चेहरा न्याहाळत होते इतक्यांत त्या शवाने डोळे उघडले. त्या क्षणी अर्जुन आणि ग्रेस ने किमान ६ फुट दूर उडी मारली. ते घाबरले होते. त्याची हालचाल रामन आणि रेणूला सुद्धां समजली. त्यांनी दोघांची विचारपूस केली पण दोघेही अगदी शांत होते.
त्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने डोळे उघडून दोघा नवीन लोकां कडे पहिले. त्याच्या चेहेर्यावर आश्चर्य, भय किंवा आणखीन कुठलीही भावना दिसत नव्हती. निर्विकार पणे काही वेळ पहिल्या नंतर त्याच्या तोंडातून शब्द आले. "माणूस? इतक्या दूर?"
"आम्ही ठीक आहोत, इथे आणखीन कोणी तरी आहे", कुजबुजून ग्रेस ने माहिती दिली.
आपल्या भाषेंत बोलताना पाहून अर्जुनला धीर आला. "आम्ही इथे शांतीचा संदेश घेवूनच आलोय. आम्ही पृथ्वी ग्रहावरचे मानव असून आम्ही संकटांत आहोत, मदत मागण्या साठी इतक्या दूर वर आलो आहोत. अर्जुन ने स्पष्ट केले.
"ग्रह, पृथ्वी … " माणसाने ते शब्द पुन्हा दोन तीनदा घोकले जणू काही तो आठवण्याचा पर्यंत करत होता.
"काही फरक पडत नाही तुम्ही इथे कोठून आलात, कशाला आलात… " त्याने उत्तर दिले.
"इथे आपण एकटेच आहत काय ? आणखीन माणूस आहेत काय ? " अर्जून ने प्रश्न केला पण त्या माणसाने काहीही उत्तर दिले नाही.
काही मिनिटे अशीच त्रासदायक शांततेत गेली. त्या माणसाचे डोळे बंद झाले होते. अर्जुन ला वाटले तो माणूस पुन्हा निद्रेत गेला असावा पण अचानक वीज चमकावी तसे त्या माणसाचे डोळे पुन्हा उघडले. ह्या वेळी तो माणूस चक्क दोन पायां वर तद्द करून उभा राहिला, त्याबरोबर त्याच्या अंगावरील प्रचंड धूळ हवेंत पसरली.
"माफ करा humans from earth , pleased to meet you , My name is …" पुन्हा काही क्षण शांत राहून त्याने आपले वाक्य पूर्ण केले "तिमु"
अर्जुन आणि ग्रेस ने एक मेकां कडे पहिले. ह्या ग्रहावर ते एकटे नव्हते त्यांची भाषा येणारा कुणी तरी होता, हे एखाद्या भासा सारके वाटत होते पण सत्य होते.