"तिमू " अर्जुनला नाव थोडे विचित्र वाटले. पण दिसायला हा एलियन अगदी माणसा प्रमाणे होता.
"Captain नक्की काय चालू आहे तिकडे ? " रेणू विचारत होती.
अर्जुनने मुद्दाम काहीही प्रत्युत्तर दिले नाही. हा नवीन प्राणी जर दुष्ट असेल तर आपल्या बरोबर इतर लोक आहेत हे त्याला जाणवून द्यायची गरज नव्हती.
"आपल्याला पाहून प्रसन्नता झाला तिमू, आपल्याला आमची भाषा कशी काय येते ? आणि आपण मानव आहात काय ? " अर्जुन ने प्रश्नाची फिर झाडली.
त्या माणसाने डोळे किलकिले केले. तिमू… हेच नाव सांगितले न मी ? तिमू, कर्दनकाळ, चालणारा मृत्यू, अनेक नवे आहेत माझी ? माणूस ? नाही मी पृथ्वीवर सापडणारा मानव नाही. हो मी वाटतो मानवा सारखा पण मी इतरांना त्यांच्या सारखा सुद्धा वाटतो. आणि भाषा ? हा! मला अनेक भाषा येतात. तुमच्या ग्रहावरील लोकांना Quantum Physics मधून time travel चा शोध लागला पण मी time हि संकल्पना मानत नाही. मी existential negation ह्या दृष्टीकोनातून जगाला समजतो. तुमच्या मध्ये द्वैत नावाची संकल्पना होत न तसेच काही तरी. त्यामुळे मला जगातील सर्व प्रकारच्या भाषा समजतात.
तिमू टकाटक बोलत जात होता, जणू काही त्याने श्वास सुद्धा घेतला नव्हता. दिसायला कृश पण डोळ्यांत एक वेगळ्या प्रकारची चमक होती. "कर्दनकाळ ?" ग्रेस ने विचारले.
"मी इतके सांगितले पण ह्या पैलवानाला काय लक्षांत राहिले ? कर्दनकाळ!" - तिमू आवेगाने पण उपहासाने बोलला.
"पण आम्हाला इथे पाहून तुम्हाला आश्चर्य नाही वाटले ?" अर्जुन ने विचारले. ग्रेस अजून सुद्धा संशयास्पद नजरेने तिमू कडे पाहत होता. सर्व संभाषण रेणू आणि रामन रेदिओ वर ऐकत होतेच.
"आश्चर्य? का बरे ? इथे अनेक लोक आले होते" … तिमू खिडकी जवळ जावून बोलला. त्याने ज्या प्रकारे ते वाक्य उच्चारले ते कोणालाच आवडले नाही.
"पण कुणी परत नाही गेले"? ग्रेस ने विचारले ?
"नाही … " तिमुने सांगितले.
"तुम्हाला आश्चर्य वाटले कारण तुम्हा लोकामध्ये काळ हि संकल्पना आहे. काळ जातो तशी सभोवतालीची परीस्थ्तीती बदलत जाते. घटना एका मागोमाग घटतात त्यामुळे घटनांचा संबंध आहे असे वाटते. त्यामुळे काही घटना जेंव्हा कारण नसताना घटतात तेंव्हा आश्चर्य भावना निर्माण होते. आणि छोट्याश्या तुमच्या आयुष्यमर्यादे मुले तुम्ही जास्त मोठी विचार शक्ती वापरू शकत नाहीत. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटते. मी इथे कधीपासून आहे ? म्हटल्यास हजारो वर्षें मी ह्या खुर्चीत बसून होतो, म्हटल्यास मी काही क्षण आधीच इथे आलो होतो. काय फरक पडतो ?"
"होय पण का परत नाही गेले ?" ग्रेस ला हाच मुद्दा महत्वाचा वाटला.
"परत नाही गेले कारण इथे येणे हे परत जाण्यासाठी नसतेच. कारण तुम्हाला हा ग्रह वाटत असला तरी हा ग्रह नाही. " तिमू बोलला
"मग ? " अर्जुन ने विचारले.
"हि एक कैद आहे. अस्तित्वाच्या संकल्पनेतील एक बुडबुडा. तुमच्या कानात रेडियो यंत्र आहे. हे यंत्र कसे बरे काम करते ? रासायनिक प्रक्रियांनी निर्माण होणार्या उर्जेने. पण तुम्ही तर फार काळ शीत निद्रेत होता. त्या हजारो वर्षातन ह्या रासायनिक प्रक्रिया खरेतर संपून गेल्या पाहिजे होत्या पण तरी सुद्धा तुमच्या यंत्रातील काही बेट्र्या चालू आहेत. इथे काय सत्य आणि काय आभास, इथे काळ किंवा स्थान काहीही सुनिश्चित नाही. "
"हो आणि तुमचे इतर साथीदार सुद्धा इथे आहेत हे मला ठावूक आहे. उगंच लपवून फक्त त्यांनाच त्रास होईल. त्यांना ह्या केबिन मध्ये आणा. मी मस्त पैकी चहा तयार करतो. " तीमुने त्यांना एका मागोमाग धक्के देणे बंद नव्हते केले.
"चहा ? इथे ?"
"वनीला अयीस्क्रीम मिळेल का ? " ग्रेस ने उपरोधाने विचारले.
"नाही, जगाच्या अनोळखी कोपर्यांत मानवी चवीला आवडणारी वनीला आईसक्रीम मिळेल असे वाटणे सुद्धा मूर्खपणाचे आहे. " तीमुने म्हटले आणि अर्जुन ने आपल्ये हास्य लपवले.
"आणि चहा मिळणे हि अपेक्षा शहाण पणाची आहे ? " ग्रेस ने उपरोधाने विचारले.
"इथे चहा आहे म्हटल्यावर त्यांत शहाणपणा, मूर्खपणाचा प्रश्नच येत नाही. चहा आणतो सगळे जन बसून पिवूयात. " तिमू चालत दूर असलेल्या बाकाजवळ गेला खालून त्याने एक बातलीवजा यंत्र काढले आणि त्यातून गरम पाण्याची वाफ आली. दुसरीकडे एका जुनाट पुस्तकांतून तिमुने चहाची दोन बेग काढली आणि गरम पाण्यात बुडवून ठेवली. काही क्षण चहाचा सुंगंध आसमंतात दरवळला.
केबिन मधील त्या वासाने अर्जुन आणि ग्रेस सुद्धा हरवून गेले. क्षणभर त्यांना आपण आपल्या घरीच आहोत असे वाटले असावे.
कॅप्टन टू रेणू … मला वाटते केबिन सुरक्षित आहे. इथे ये.
रेणू आणि किलो काही मिनिटांत केबिन मध्यॆ आले. रेणूने आ वासून तिमू कडे पहिले. तिच्या मनात कदाचित अनेक वैद्यकीय प्रश्न आले होते पण आ मात्र तिने चहा च्या वासाने वासला होता. "हि घे चहा. " ग्रेस ने तिच्या हातांत गरम चहा दिला.
किलो शांतपणे उभा होता. किलो नक्की रूम स्कॅन करत असावा असे ग्रेस ला वाटले. काही गौडबंगाल असेल तर किलो नक्की शोधून कडू शकत असेल असे त्याला वाटत होते.
"आमच्यांत चहा बरोबर गप्पा सुद्धा मारल्या जातात. " रेणूने तिमू कडे पाहत म्हटले.
तिमुने तिच्याकडे पाहून स्मित केले. हो ठावूक आहे. आणि तुला जर इच्छा असेल तर तू मला हात लावून पाहू सुद्धां शकतेस. मी यंत्र नाही, मी सुद्धा तुमच्या प्रमाणे एक जीवित प्राणी आहे.
आपले विचार तीमुने ओळखले हे पाहून रेणू थोडी ओशाळली. पण तिला उत्सुकता सुद्धां होती. "आपण इथे कधी पासून आहात? इथे आपल्याला अन्न पाणी कुठून भेटते ? आपल्या सारखे इतर लोक आहेत का इथे ? " रेणूने विचारले.
"मला वाटते आता मी तुम्हा सर्वाना जास्त माहिती देवू शकतो." असे बोलून तिमू पुढे आला.
"हा ग्रह प्रत्यक्षांत फक्त साधारण ग्रह नाही. हि आहे एक कॉस्मिक जेल. म्हणजे कैदखाना. इथे आम्ही येवू शकतो पण परत जावू शकत नाही. इथे काळ-स्थानाच्या संकल्पना वेगळ्या आहेत. कधी कधी आपल्या कपड्यांत चोर खिसा असतो त्या प्रमाणे विश्वाच्या पोकळीत अनेक चोर कप्पे असतात. हे कप्पे दुर्बीण पाहू शकत नाही, मानवी यंत्रे हे कप्पे शोधू शकत नाहीत. विश्वांत फार कमी जीव आहेत जे काल-स्थान ह्या संकल्पना फार चांगल्या समजतात. असे जीवच हे कप्पे शोधू शकतात पण त्यांतून बाहेर पडणे त्यांना सुद्धा शक्य होत नाही. " तीमुने सर्वाना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
"हा कैदखाना आहे तर इथे इतर कैद कुठे आहेत आणि कुणी केला हा कैदखाना ? " अर्जुन ने विचारले.
"रास्त प्रश्न आहे. इतर आम्ही एकटे नाही. इथे आणखीन जीव आहेत. आणि त्यातील बहुतेक जीव चांगले नाहीत. ज्या प्रमाणे एखाद्या कैदॆत अराजकता असते त्याच प्रमाणे ह्या ग्रहावर सुद्धां अराजकता आहे."
"पण आम्ही अजून तरी कोणाला नाही पहिले …. " रेणूने सांगितले. "आणि आम्हाला आंत कुणी टाकले ? " अर्जुन ने विचारले.
"तुम्ही आंत कसे आलात हे मला अजून ठावूक नाही. कदाचित तो अपघात होता. कदाचित तो अपघात नव्हता. पण तुमच्या आगमनाने ह्या ग्रहावर एकाच धांदल उडणार आहे." तिमु.
"का?" - ग्रेस
"कारण तुमच्या यानात तुम्ही अनेक भ्रूण घेवून आला आहात. हे भ्रूण घेवून इथे मोठी वस्ती निर्माण केली जावू शकते. गुलामाची सेना निर्माण केली जावू शकते." तीमुने सांगितले .
"पृथ्वी ग्रहावरील भ्रूण गुलाम निर्माण करण्यासाठी नाहीत. " रेणूने सांगितले.
"मला ते सांगण्याची गरज नाही, ह्या ग्रहावरील इतर लोकांना ते सांग" तीमुने रेणूला तीक्ष्ण पाणे सांगितले.
"मग आमचे यान धोक्यांत आहे ? " ग्रेस ने प्रश्न केला.
"अजून नाही. पण काही काळाने हो. ग्रहाचा हा भाग फारच निर्जन आहे आणि तसेच इथे हेलो-२ नावाची उर्जा आहे. ह्या ऊर्जेमुळे बहुतेक लोक इथे येण्याचे धाडस करत नाहीत. तुम्ही मानव लोक त्या ऊर्जेपासून प्रतिकारक आहात, तुम्हाला धोका नाही. " तिमुने सांगितले.
"मग इथे अन्न पाण्याची व्यवस्था काय ? " रेणून आपला आधीचा प्रश्न विचारला.
ग्रेस बाहेर गेला कदाचित त्याला रामन ला सुचित करायचे होते.
"मी आधी सांगितल्या प्रमाणे ह्या ग्रहावर काळ-स्थान संकल्पना तुमच्या आकलनाच्या पलीकडील आहेत. ह्या ग्रहावर घनदाट जंगले आहेत, प्रचंड महासागर आहेत. इथे अन्न पाणी भरपूर आहे. इथे लक्षावधी प्रकारच्या वनस्पती, प्राणी प्रजाती आहेत. पण एक महत्वाची गोष्ट इथे नाही त्यामुळे तुमचे भ्रूण आणि इथील प्रजाती ह्यांत फार फरक आहे. इथे काळ सापेक्षता नाही. त्यामुळे इथे तुम्हाला एक प्राणी सापडला तर तो प्राणी काळातील एक न हलणारा बिंदू आहे. म्हणजे त्या प्राण्याला भूत, वर्तमान, भविष्य नाही. त्यामुळे तुमच्या ग्रहाव तुम्ही ज्या प्रमाणे उत्क्रांत होता त्या प्रमाणे इथे कोणीही उत्क्रांत होत नाही. कुठलीही प्रजाती नवी ज्ञान अर्जित करूत पुधील पिढ्यांना देवू शकत नाही. त्यामुळे इथे जे कैदी आहेत त्यांना कुणालाही ह्या प्रजातीना गुलाम बनवून आपले काम करवून घेता येत नाही. तुमी प्राणी क्ष ला मारून खाल्ले तर काही वेळाने तुम्हाला पुन्हा तो प्राणी क्ष तिथेच दिसेल. पण जे कैदी आहेत त्यांना मात्र हे काल नियम लागू पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही प्रजनन करू शकता, मुलांना वाढवू त्यांना भविष्याला सामोरे जायला मदत करू शकता." तीमुने आणखीन माहिती दिली ती ऐकून अर्जुन आणि रेणू चक्रावून गेले.
"तुम्ही इथे का आहात ? तुमचा उद्देश काय ?" रेणूने विचारले.
"मी एक अस्तित्व आहे, मला शरीर आहे असे वाटले तरी मला शरीर नाही. मला मन नाही, बुद्धी नाही. मी विश्वांत सगळीकडे होतो, काल-स्थान ह्यांचे बंधन मला नव्हते. मला बोलायची गरज नव्हती, चालायची गरज नव्हती. म्हटल्यास मी सर्व काही होतो, काही साठी मृत्यू तर काही साठी देव.अनेक नावानी मला लोक संबोधित होते पण सर्वांनाच माझी भीती वाटत होती. मी इथे स्वतःहून आलो. मला इथून बाहेर पडता येत नाही. अद्याप तरी नाही. पण तुम्ही इथे पोचलात आणि मला इथून निसटण्याची शक्यता निर्माण झाली. " तीमुने आणखीन माहिती दिली.
"ती कशी काय ?"
"ते मी नंतर सांगेन, तुम्ही आपल्या ग्रहावरील प्रजातींचे रक्षण करू इच्छिता ना ? मी तुम्हाला त्या कामांत मदत करू शकतो. किंबहुना माझ्या मदतीशिवाय तुम्हाला ते शक्य नाही. पण त्या बदल्यांत योग्य वेळी तुम्ही माझी मदत करू शकता. कसली मदत ते सध्या मला ठावूक नाही, पण मी नंतर सांगेन."
अर्जुन ने काहीही उत्तर दिले नाही. ह्या ग्रहावर ते परके होते. तिमू निशस्त्र होता आणि त्याच्यावर विसंबून राहण्यापेक्षा दुसरा मार्ग तरी त्याला दिसत नव्हता.
"ह्या ग्रहावर आम्हाला एक लहान ठिपका दिसला होता जो किलोने जीवन म्हणून फ्लेग केला होता. तो आपण होतात काय ? " रेणूने विचारले.
"नाही, तो ठिपका येथील फार महत्वाचा लेंडमार्क आहे. चला आपण जावून बघुया."
असे म्हणून तीमुने केबिन बाहेर प्रस्थान केले. अर्जुन आणि रेणू त्याच्या मागोमाग गेले. अर्जुन ने ग्रेसला नजरेने मागे थांबायला सांगितले. कदाचित तिमू काही लपवत असेल तर ग्रेस त्या केबिन मध्ये शोध घेवू शकत होता. किलोचे काही सेन्सर नवीन माहिती मिळवू शकत होते.
तिमू त्या लाल मातीवरून चालत होता आणि आकाशांतील विजांचे खेळ पुन्हा सावल्यांचे खेळ खेल होते.