प्रेमात
आणि युद्धात सगळ काही माफ असतं
असं म्हणतात ... पण खरतर
....
भावनेनं मारायचं असतं अन
मनान पुन्हा उभारायचं असतं
रडत.. कुढत.. का होईना
जगण्याच रहाट चालूच ठेवायचं असतं
जगासाठी आनंदी दाखवणं असतं..
स्वत: मात्र एकांतात झुरायचं असतं
उगाच practical वगैरे
जगणं अनुभवायचं असतं
एकट्याशीच संवाद साधत राहायचं असतं
काय चूक... काय बरोबर...
कोणी किती खरं..
किती खोटं
याच मोजमाप अविरत चालू ठेवायचं असतं
उगाच स्वतःला दोष द्यायचा असतो
पण मन मात्र तिच्यातालेच दोष टिपत असतं
आधुनिक space... Committed...
Liberal... secure... personal..
वगैरे शेलक्या शब्दांचे जोडे
वावगत फिरायचं असतं
स्वतःच म्हणणं ठाम असून
कोणी विचारात नसतं
नाहक सल्ल्यांचा पाऊस
सहन करत बसायचं असतं
कळत नकळत भूतकाळावर
राग येत असतो भविष्याचा विचार करायचा
देखावा करत वर्तमान
मात्र थंड असतं..
निवांत...
जगाच तार्किक वगैरे अनुभवत
स्वतःलाच खोदून खोदून पटवायचं असतं
न जाणो नवा घडेल काहीतरी असं म्हणत
असंख्य दिवस ढकलायचं असतं
काही म्हणा प्रेमात पडाव
मात्र निभावाण्यासाठीच
असं म्हणणारी बरीच
मात्र जगणारी मात्र थोडकीच
प्रेमात का व कोण याचा काही
जगण्याशी संबंध नाही उगाच पोकळीतल्या
एकटेपणाला साथसंगत वगैरे म्हणायचं असतं
काही मात्र थोर अनुभवी संत
सगळं कसं settled करणारे
दोन्हीकडे जाऊन शब्दबंबाळ चर्चा करणारे
दिवस रात्रौ उगाच उदाहरणांचा भडीमार करणारे
अमका.. तमका... फलाना... टिमका....
स्वतः मात्र नामानिराळे
किनाऱ्यावरून पोहायला शिकवणारे
बुडणारा मात्र खडबडीत जागा होऊन
केविलवाणा ओशाळलेला.....
एककल्ली एकटाच राहणारा
शून्यात नजर लावून बसणारा
आगाउपणे व्यसनं करणारा
जगाला चुकीच्या नजरेने पाहणारा
सगळ्याच नात्यांना तुच्छ लेखणारा
नाकर्ते लोकांच्या संगतीत राहणारा...
कधी कधी जगायचं पण सोडून देणारा....
अशा जगण्याच्या मैफिलीत सर्व
अनुभव घ्यायचे असतात
काही भोगायचे असतात
काही जगायचे असतात
कळवळलो तरी मागं हटायचं नसतं
निर्विकारपणे सत्य असत्याचा मागोवा
घेत नवं जगणं अनुभवायचं असतं
भूषण
वर्धेकर
२०-०२-२००८
भारत गायन समाज
पुणे