ऑफिस म्हणजे अजब जंत्री ...

सगळेच करतात काम...

काही मनापासून तर काही मनाविरूद्ध

काही तर आवडीची नोकरी मिळेपर्यंत करायची म्हणून करतात..

काही जणांची पाट्या टाकण्याची जागा

काही म्हणा आवडीची नोकरी आणि समजूतदार बायको फक्त स्वप्नातच मिळते

प्रत्यक्षात मात्र खेळखंडोबा ...

ऑफिसवरून एक आठवलं ... एक आटपाट नगरातलं होतं ऑफिस होतं ...

कामगार होते उच्चशिक्षित.. चकाचक इमारती.. प्रसन्न बैठका... मोहक वातावरण एकजण नुकताच जॉईन झाला... फ्रेशर म्हणून..

करायची होती म्हणून करत होता नोकरी... अनुभवासाठी

गड्याचं सुरुवातीला बिनसलं सोबतचे होते वयस्क ... मग काय हा तर होतकरू... अनुभवशून्य

लोकांचा वाढता कामाचा बोजा याच्यावर...विनाकारण भरपूर शिकून घे म्हणून पडायचा

एक मन म्हणायचं सोड नोकरी दुसरं मात्र रडतं-कुढत ...

एकदा काय झालं त्याची झाली चूक शिक्षा म्हणून दिलं लो प्रोफाईल जॉब

सहा महिने झाले रोज तेच.. ते... तेच... ते

कळत नव्हते काय करावे... एकदा मात्र हद्द झाली नोकरी सोडावी म्हणून सनक आली

गेला साहेबांकडे पण ते होते मिटींगमध्ये... दुसऱ्या दिवशी आल्यावर पाहतो तर काय..

चालू होती कामगारभर्ती.. गर्दीत सुखावणारे चेहरे पाहून मंदावला ..नोकरी सोडायचा विचार नंतर करावा म्हणून सरसावला..

वाटलं नवीन भर्तीत कोणीतरी गर्दीतल्या लोकांपैकी...

झालं मनासारखं.. आली ती ट्रेनी म्हणून त्याच्याच विभागात...

साहेबांनी दिली ओळख करून हा तर खुश होताच सोबतीला चांगली कंपनी म्हणून...

काळ मात्र वाइट हो.. याला जास्त दिवस ठेवले नाही कंपनीनं  त्याच्या विभागात...

दुसऱ्या विभागात रवानगी केली ... गेला सगळं हातातून.. तिने त्याला ग्रीट केले

दुसऱ्या दिवसापसुन नवा विभाग नवं काम .. नशीबान आवडीच काम तर मिळवून दिलं ..

मन मात्र तिकडच रमलं.. मग काय हळूहळू चोरून पाहणं आलं .. ओरकुट वगैरे फ्रेंड लिस्ट मध्ये आणि फॅन लिस्ट मध्ये येणं झालं...

हा मात्र नाराजच.. रोज रोज लांबून पाहणं.. कामापुरतं हाय बाय बोलणं

जेवणाच्या सुट्टीत मंद हसणं वगैरे चालूच होतं ...

हळूहळू आणखी काही दिवस गेले दोघेही छान त्यांच्या त्यांच्या कामात रमले...

अचानक एक असाईन्मेंट आली ...तिच्या आणि ह्याच्या विभागाची मीटिंग झाली..

कर्म धर्म संयोगाने दोघांकडे जॉईन्ट टास्क आलं

मग काय .. मन कसं आनंदलं

हा कधी नव्हे तर ऑफिस वर वेळेच्या आधी

रंगीबेरंगी भावनांचा कल्लोळ उगाच काम करायचा शिरजोर

दोघेही कामात तसे तरबेज

हा मात्र एकांतात कुठेतरी गुंतलेला.. काम तसं झकास होतं  चालू..

हा मात्र डिप्रेस उगाच तिने समजूत काढावी म्हणून...

कामाव्यतिरिक्त भेटावं म्हणून... रिलॅक्स होण्यासाठी...

ती मनमोकळी बिनधास्त .. संध्याकाळी थांबू म्हणाली कॉफी घेऊ म्हणाली

मग मात्र हा खुश झाला मनोमन ...

कधी नव्हे तो दोघांची कामे करून फ्री झाला... फ्रेश तर मनापासूनच होता

संध्याकाळ व्हायची वाट पाहत होता,...

संध्याकाळ झाली... कॅफेत गेली.. snacks आले कॉफी आली... डिस्कशन झाले...

आवड निवड शिक्षण वगैरे ... आदानप्रदान

दुसऱ्या दिवशी कसं एकदम ताजतवानं.. फ्रेश वगैरे..

काम होत आलं पुन्हा भेटणं झालं.. पुन्हा कॉफी .. वगैरे....

जॉईन्ट टास्क पूर्ण झाल.. अभिनंदन झालं.. वर्षा अखेरीस event झाला.. मग काय जो तो आपापले कलागुण दाखवू लागला .. खेळप्रकार उदंड झाले..

हॉटसीट .. ड़मशिराज.. डेअर टू विश ... गाण्याच्या भेंड्या .. Q & A ..वगैरे वगैरे..

 

ह्याच्या कवितांनी कार्यक्रमाची सांगता झाली.. सगळेच अवाक.. हा कविता सुद्धा करतो.. कौतुकेच कौतुके ...

ती सुद्धा खुश होऊन म्हणाली मला कधी  तू बोलला नाहीस..कविता करतो म्हणून..

तो हळूच म्हणाला आपण पर्सनल कधी बोललोच नाही.. ती मात्र खुश..

म्हणाली एक दिवस भेटू खास तुझ्या कवितांसाठी...

ह्याला तर काय सार्थक झाल्यागत वाटलं

कवितामुळेच राणीमार्ग सापडला...

मग ठरलं... भेट झाली.. काव्यवाचन झाले.. दोघे पण मस्त.. कॉफीचे घुटके.. चमचमीत पदार्थ ... आणि ह्याच्या कवितांचे अर्थ.. अशाच भेटी व्हाव्यात म्हणून ह्याच्या मनातल्या मनात शर्थ ... असो पुढे काय हळूहळू दोघे रुळले...

गाठीभेटी वाढल्या sms सुरु झाले उदंड ...

ह्याच्या मनात बरचसं दाटलेलं.. कॉलेज मध्ये असेच अव्यक्त राहिलेलं होतं

हे हातातून जाऊ नये म्हणून मनोमन काहीतरी जळत होतं.. अचानक एके दिवशी रात्री फोन आला तिचा.. उद्या मी चाललेय बाहेरगावी भेटू नाही शकत काही दिवस तिकडून स्पष्टोक्ती

मग याला झाली होती सवय sms आले गेले.. खूप miss झाले...

हा मात्र गदगदला असं आधी कधीच झाल नव्हतं.. उगाच सवय झाली म्हणून असं होत असावं म्हणून मनाला समजावत होता.. पण मन तर तिकडचेच झाले होते.. गेले कसेबसे तीन चार दिवस ती आली पुन्हा .. ऑफिस झाले सुरु.. गाठी भेटी पण झाल्या ..हा बाबा नव्या जोशात अवतरला.. मनात काहीतरी बोलायचं ठरवून तिच्याकडे गेला

ती मात्र नेहमीप्रमाणेच हाय.. बाय.. कसा आहेस वगैरे.. वगैरे..

भेटल्यावर कळलं ती गेली होती मूळगावी... मग इकडच्या तीकडच्या गप्पा .. किस्से..

ह्याला मात्र वेगळेच टेन्शन... त्यात तिला आला फोन..

आज मात्र हळूच गेली बाजूला बराच वेळा बोलत .. हा बसला ताठकळत ..

ह्याची झाली बत्ती गुल.. कोणाचा असेल हा फोन.. कोणाशी बोलत असेल ही.. हात पाय लटपट ..या आधी असं कधी नाही घडलं

एक अनेक प्रश्न .. लक्ष्य खाण्यात पिण्यात ...

एकटक तिच्या दूरवरच्या बोलण्यात...अखेर ती आली निघते म्हणत लगोलग निघाली

हा नाखुषेने हो ठीक आहे परत उद्या म्हणून निघाला...

झालं आठवडा याचा असाच गेला हुरहूर मनाची वाढत गेली

ह्याच तिला फोनवर बोलताना पाहणं.. उगाच काळजात धस्स होण... सारख तिचाच विचार करण.. मन मोकळ कराव असे सारखे वाटणंकाय वाट्टेल ते होईल.. सगळं कसे सांगून मोकळ व्हायचं... खुरडत कुठवर जगत राहायचं

मग पुन्हा कॉफी.. वगैरे खाण पिणं ...गप्प्पा टप्पा...आली एक वेळ.. साधला याने मेळ

बोलून टाकलं सगळं.. कसं झालं मन मोकळ मोकळ

ती तशी practical.. शुद्ध हरपता सहज बोलली.. हे तुला आजच कां सुचलं

त्यान तिला सगळ खर खर सांगितलं... मग ती ओशाळली .. आधीच का नाही बोललास .. आता मात्र उशीर केलास.. मुळगावी माझ ठरलं.. त्याला मी कधीच हो म्हटलं...

 

तो जागेवरून आठ इंच उडाला .. म्हणजे आधी कां नाही बोलला याचा अर्थ

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel