इथे माणूस मरतो
नंतर त्याचा धर्म ठरतो
मग सादर होतो अहवाल
सुस्त शासन अन् माध्यमे मस्तवाल
मग येतात फुत्कार चंगळवादी
प्रखर होतात जाणीवा राष्ट्रवादी
काथ्याकूट होतो बाजारू मानवतेचा
एकच दिवस असतो बौद्धिक निषेधाचा
जोशात भरले जातात वृत्तपत्रीय रकाने
चर्चा झाडल्या जातात तावातावाने
नको त्यांचा वधारला जातो भाव
उगाच उकरून काढतात जुनाट घाव
काही काळ असाच जातो निघून
शांततेचा चित्कार चौफेर घुमून
फुकाचे विचारवंत अन् चौकटीतले जगणे
ज्याचे त्याचे कर्म स्वतःचे तुंबडे भरणे
दुटप्पी माणूसकीचे अवशेष भग्न
सकल प्राणीमात्र रोजच्या दिनचर्येत मग्न
--भूषण वर्धेकर
9-10-2015
8:30 रात्रौ
दौंड-पुणे शटल
------------------------------------------------ आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.