अब्जावधी हृदयाचा ठेका
चाले यांच्यासंगे
लेकरा तुही चाल, चालत रहा
वाट फुटेल तिथे
उगाच काही विचारू नको
कसली उत्तरे शोधू नको
आपणच इतरांची उत्तरे आहोत
असे समजून चालत रहा
तो पहा आपला नेता कुलपती
समाजाचा उद्धार करतोय
कळसासाठी आपल्याच
बांधवांचा रक्ताभिषेक
बाता मात्र क्रांतीच्या,
अभ्युदयाच्या व्याप्तीच्या
सकलांचा कर्दनकाळ
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार
रक्तमासांचा चिखल करून
ज्याने घडवला हा देश
त्यांचेच वंशज सत्तेवर
सेवा मात्र स्वकीयांची
अखंड तेवणारी
कर्तृत्वाची वात
निर्वात पोकळीशी झुंजते...
२५/०७/२०११
उरूळीकांचन स्टेशन आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.