ज्याचा त्याचा महापुरूष
ज्याचा त्याचा पंथ
राजरोस अविवेकी ऊरुस
हीच सार्वत्रिक खंत
विचारांची पायमल्ली
दिमाखदार गाठीभेटी
समारंभ गल्लोगल्ली
कार्यकर्ता अर्धपोटी
योजनांचा महापूर
महापुरूषांच्या नावे
सत्तेसाठी वेगळे सूर
जातीपातीत हेवेदावे
विचारवंत स्वयंघोषित
फ्लेक्ससाठी फोटो ऐटीत
नितीमत्ता गेली मातीत
समाजकल्याण लालफितीत
सरकारी टक्केवारी
कागदोपत्री जमवलेली
मंत्र्यांची हमरीतुमरी
कमिशनसाठी आसुसलेली
भाबडी जनता आशाळभूत
सकल ऊद्धाराच्या प्रतिक्षेत
महापुरुषांचे पुतळे सुशोभित
विखुरलेल्या चौकाचौकात
भूषण वर्धेकर
9-11-2010
उरुळीकांचन आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.