एका चांगल्या जर्मन ग्रंथांत हीच पध्दती अवलंबिलेली मला दिसून आली. जा ग्रंथप्रकारांचे नांव मधुर होय. एकोणिसाव्या शतकांतील सौंदर्यशास्त्राचा इतिहास - असा त्याने ग्रंथ लिहिला आहे. रॅफेलच्या पूर्वी होऊन गेलेले कलावान्, तसेच दुसरे गूढवादी, प्रतीकवादी या सर्वांचे वर्णन त्याने केले आहे. परंतु या कलावानांच्या कृतींना दोष देण्याचे धैर्य त्याच्याजवळ नाही. यामुळे तो आपल्या कलेच्या व्याख्येची बंधने जरा ढिली करीतो व या सर्वांच्या कृतीत अंतर्भाव कलेमध्ये करून घेतो ! यथार्थवादाचे जे दुष्पपरिणाम झाले त्यांना गूढवादी व प्रतीकवादी यांनी बंड करून पायबंद घातला असे त्याला वाटते व म्हणून उदार होऊन कलामंदिराचे दरवाजे उघडून त्यांनी तो आंत घेतो; कलाकृतीत वाटेल तो बाष्कळपणा व चावटपणा का असेना, समाजाच्या वरच्या वर्गातील लोकांत जर त्या कृतीना मान्यता मिळाली असेल तर लगेच असे कलाशास्त्र बनविण्यात येते की त्या सर्व बाष्कळपणाचा व त्या अविचारीपणाचा खुशाल कलाक्षेत्रांत प्रवेश व्हावा ! कलेचे पोट एवढें मोठे होतें की वाटेल ते त्यांतस मावते व मावते. फक्त वरच्या वर्गातील लोकांच्या पसंतीचा शिक्का असला म्हणजे झाले ! त्या वरच्या वर्गाना जे आवडते ते ओंगळ, घाणेरडें कसे असू शकेल ? वरच्या वर्गाना जे प्रिय व मान्य आहे ते बाष्कळपणाचे, असत्य व अमंगळ असे कसे असू शकेल ? आजकालच्या जमात्र्नयात कलेची कितश्री अधःपात होईल हे सांगतां येत नाही कलेतील अविचार व ओंगळपणा कोणत्या थराला जातील ते सांगवत नाही. आजच्या वरच्या वर्गात कलेचे काय स्वरूप आहे ते पाहृून त्यावरून अंदाज करता येईल. वरच्या वर्गात रूढ असलेली व मान्य असलेली जी कला ती निर्दोष असे समजण्यात येत असते.
ज्या कलेची सौंदर्यावर उभारणी करण्यात आली, ज्या कलेचें सौंदर्यमीमांसकांनी नानापरींनी विवेचन केलें, ती ही कला म्हणजे शेवटी काय ? तर जी सुखविते, (सर्वांना नव्हे तर) काही विचक्षित वर्गाना सुखविते - ती कला ! विवक्षित वर्गाला जे जे सुखवील ते ते कला म्हणून मानावयाचे ! ह्यापलीकडे ह्या शास्त्राला काही एक कर्तव्य उरत नाही. बहुजनसमाजही हीच अंधुक, अस्पष्ट अशी कलेची व्याख्या घेऊन चालत असतो.
कोणत्याही मानवी व्यापाराचे जर वर्णन करावयाचे असेल, त्या व्यापाराची जर व्याख्या करावयाची असेल, तर त्या व्यापाराचे महत्त्व, त्या व्यापाराचा अर्थ ही नीट समजून घेणे आवश्यक आहे. आणि हे समजून घेण्यासाठी त्या व्यापाराचे सर्व बाजूंनी परीक्षण करणें हे जरूरीचे असते. त्या मानवी व्यापाराची कारणे, त्याचे परिणाम हे सारे लक्षात घेतले पाहिजे. त्या व्यापारापासून आपणांस सुख काय परिणाम हे सारे लक्षात घेतले पाहिजे. त्या व्यापारापासून आपणांस सुख काय होते, एवढयाच दृष्टीने त्याच्याकडे पाहून त्याचे खरे स्वरूप व मर्म आपणांस समजणार नाही. कोणत्याही व्यापाराचा हेतु केवळ सुखप्रदान एवढाच आहे असे जर आपण म्हणू व त्या व्यापाराची व्याख्या त्या एका लक्षणानेंच जर आपण करू पाहू तर ती व्याख्या उघडउघड चुकीची व सदोष अशीच ठरेल. कलेची व्याख्या करण्याचे जे जे प्रयत्न होतात त्यात असलाच चुकीचा प्रकार सदैव होत असतो. आपण उदाहरण घेऊ. अन्नाचा प्रश्न घ्या. अन्नभक्षण करीताना आपणास जे सुख होते, त्याच्यावर भर देण्याचे महत्त्व कोणाला वाटते का विचारा. अन्नाचे महत्त्व जेवताना होणा-या आनंदावर किंवा सुखावर नाही. अन्नाचे गुण-दोष ठरविताना आपल्या रुचीचे समाधान हे प्रमाण मानून चालणार नाही. ज्या अन्नाची मला सवय आहे, जे अन्न मला आवडते, मला रुचकर वाटते, ज्या अन्नात मद्य आहे, मिरपूड आहे, खवा आहे, असे जे माझे अन्न - तेच सर्वोत्कृष्ट होय व तेच सर्वांनी खाल्ले पाहिजे असे जर मी म्हणेन तर ते योग्य होईल का ? असे म्हणण्याचा कोणालाच अधिकार नाही.