लिस्टवर्स मधल्या लोकांना  खून मालिके चे नेहमीच आकर्षण राहिले आहे. मानवाला नेहमीच अशा राक्षसी मनोवृत्तीच्या लोकांबद्दल  कुतूहल आहे जे खून मालीकेसारखे दुष्कृत्य गुन्हे करत आलेले आहेत, फार तर काय हा विषय नेहमीच लोकप्रिय सुची मध्ये राहिला आहे..

आपल्या सगळ्यांना च अशा सिरियल खुन्यांना अखेरीस शोधावे आणि धरावे हा विचार नक्कीच आवडतो पण सगळ्याच बाबतीत असे होतेच असे नाही. काही सिरियल खुनी हातावर तुरी देऊन निसटतात आणि अनेक वर्ष च काय तर दशके हि धरले जात नाहीत - आणि काही तर कधीच पकडले जात नाहीत. कदाचित खाली निर्दिष्ट केलेल्या दहा लोकांपैकी एखादा आज हि रस्त्यांवरती भटकत असेल.



फेब्रुवारी 9 किलर

९ फेब्रुवारी रोजी, सॉल्ट लेक सिटी च्या एका उपनगरामध्ये, एका हिस्पॅनिक स्त्री वर ती अपार्टमेंट मध्ये एकटी असताना हल्ला झाला आणि तिचा खून करण्यात आला. अविश्वसनीय रित्या , याच घटनेची २००६ आणि २००८ या दोन्ही वर्षात पुनरावृत्ती झाली. आणि जरी अशी पुनरावृत्ती हि सुरुवातीला एक भयानक योगायोग समाजली  गेली तरी दोन्ही ठिकाणच्या गोळा केलेल्या पुराव्या वरून  DNA  चाचणीच्या विश्लेषण नंतर  खून हे एकाच व्यक्तीने केले असल्याचे सिद्ध झाले, या घटनेवरून माध्यमांनी लागलीच याचे  फेब्रुवारी 9 किलर असे नामकरण केले.

२००६ च्या केस मध्ये , शिकार झालेली सोनिया मेजिया हि गरोदर होती जेंव्हा तिच्या वर प्राणघातक हल्ला झाला आणि तिचा गळा दाबून खून करण्यात आला. तिच्या अपार्टमेंट मधून काही गोष्टी चोरीला गेल्या पण त्यांचा कधीच सुगावा लागला नाही. २००८ मध्ये सेमियाना कस्तिलिओ चा असाच गळा दाबून खून करण्यात आला जी मेजिया च्या घरापासून काही मैलांच्या अंतरावर च राहत होती. या दोन्ही हि घटनां मध्ये सक्तीने शिरकाव केल्याच्या खुणा नव्हत्या - आणि जेंव्हा चौकशी संस्था यामध्ये सहभागी झाल्या तेंव्हा अजूनही हे दुष्कृत्य करणारी व्यक्ती हि एक च आहे आणि तिला सेरियल किलर असे शिकामोर्तब करायला अत्यंत नाखूष होत्या , जरी हे चोख वर्णन दिसून येत होते कि एकाच दिवशी , दोन वर्षांच्या अंतराने दोन्ही महिलांचा खून एकाच पद्धतीने करण्यात आला होता.

जरी पोलिसांकडे खुन्याचे अस्पष्ट असे वर्णन होते तरी ते हे सांगायला तयार नव्हते कि ते त्या पर्यंत कसे पोहोचले, आणि त्यांच्या कडे असलेल्या DNA  प्रोफाईल नमुन्यामध्ये  मध्ये संबधित प्रोफाईल चा धागा मिळाला नाही - म्हणजेच असे दुष्कृत्य करणारी व्यक्ती जर अखेरीस या  DNA  चा नमुन्यास असंबधित गुन्ह्यासाठी शरण आली नाही तर , कदाचित ती कधीच पकडली जाऊ शकणार नाही.



द फॅंटम किलर

टेक्सास टेक्सरकाना आणि टेक्सरकाना अरकन्सस च्या दुहेरी शहरांमध्ये केवळ एकदाच खुनी मालिकांची अहवाल केस ची बातमी झाली होती - आणि या घटने ने १९४६ मध्ये कित्येक महिने संबधित भागामध्ये भीतीच्या दहशती वर पकड होती. शनिवार आणि रविवारी - आठवड्याच्या शेवटी - साधारणतः त्या कालावधीमध्ये दर काही आठवड्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये - एकंदरीत एकूण पाच लोकांचा मृत्यू झाला आणि आणखी तीन जण जखमी झाले. या घटनेचा  तीस वर्षांनंतर हि लोकांच्या मनावर इतका जबरदस्त पगडा होता कि,  The Town That Dreaded Sundown या भयपटासाठी हि घटना प्रेरणा बनून राहिली..

केवळ सुरुवाती चे दोन बळी , मेरी जिआन लारेय आणि जिमी होलीस , दोघेच  त्यांच्या हल्लेखोराचे वर्णन करू शकले-  जे कि उपयुक्त असण्या पेक्षा जास्त भयावह होते.त्यांनी वर्णन केलेली व्यक्ती सहा फूट उंच होती आणि तिने डोक्यावरती एक सामान्य पांढर्या रंगाची पिशवी घातलेली होती, जिला फ़क़्त डोळ्यांच्या आणि तोंडाच्या जागेवरती भोक होती. इतर हल्यांच्या दरम्यान हल्लेखोराने असा मुखवटा धारण केले होता कि नाही हे ज्ञात नाही. फ़क़्त अशा हल्ल्यातून तिसरी बचावलेली व्यक्ती त्याला पाहू नाही शकली. खुन्याने ३२.२  कॅलिबरअसलेले पिस्तुल चा वापर करून , जवळ जवळ तीन आठवड्यांच्या दरम्यान रात्रीच्या काळोख्या अंधारात मध्यरात्री आपला खुनाचा खेळ चालवला ..

अशाच एका खुनानंतर शेरीफ विल्यम प्रिस्ले ने माध्यमांसमोर , " हा खुनी मला आजतागायत माहिती असलेला नशीबवान खुनी आहे. कोणी हि त्याला पाहू शकत नाही, बर्याच दिवसांमध्ये याची काही बातमी नसते आणि कोणी हि त्याला कोणत्या हि पद्धतीने ओळखू शकत नाही. " असे उद्गार काढले. अशा व्यक्तव्याने  माध्यमांनी त्याला द फॅंटम किलर - आभासी खुनी ,  असे नाव दिले , आणि झालेल्या हत्या टेक्सरकाना मून लाइट हत्या नावाने ओळखल्या गेल्या. एक संशयित , युएल स्विनी याला कार च्या चोरी पुनरावृत्ती च्या गुन्ह्या साठी १९४७ मध्ये कैदेत टाकले आणि १९७३ मध्ये सोडून देण्यात आले,त्याच्यावर कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषारोप ठेवण्यात आले नाही. तरी कायद्याच्या काही अंमलबजावणी नुसार आणि माध्यमांच्या नुसार या हत्या आधीच्या झोडिआक किलर ने केल्या असल्याचे तर्क लढवले गेले , जे कोणत्या हि प्रकारे कधी च सिद्ध झाले नाही.

 

द डूडलर

१९७० मध्ये अमेरिकेत समलिंगी - गे असणे अतिशय अवघड आणि धडकी भरवणारी गोष्ट होती. अगदी तुलनात्मक दृष्टीने पाहता स्वीकार्य समुदायामध्ये हि पक्षपाती पण कधी हि याचं पितळ उघड पडू शकत होते, आणि याचे भक्षक झालेल्या तरुण समलिंगी पुरुष ला याची भयावह स्पष्टता समजून चुकली होती.

"द डूडलर" किंवा "द ब्लॅक डूडलर"  असे माध्यमांनी त्याला टोपण नाव बहाल केले होते ज्या पद्धतीने त्याने खून करण्याची पद्धत अवलम्बवलि होती, जरी त्याने बळीस पडलेल्या लोकांच्या राहत्या घरात एक सोबती म्हणून शिरकाव केला होता.  आणि त्यांची हत्या करण्यापुर्वी त्यांचे रेखाचित्र बनवत असे. हे किती घाबरवून सोडणारे होते ?

जानेवारी १९७४  ते फेब्रुवारी १९७५ या  एका वर्षा च्या कालावधी दरम्यान, खचित च कमी नाही पण चौदा तरुण समलिंगी पुरुष ठार झाले. आणखी तीन जणावर हल्ला केला गेला ,पण ते  वाचले  - आणि खटले अनाकलनीय च राहिले कारण बचाव झालेल्यांनी मुख्य संशयित आरोपी विरुद्ध स्वतःची ओळख उघड न करण्याचा आणि विषाची परीक्षा न घेण्याचा पवित्रा घेतला.  या सगळ्या घटना अमेरिके च्या त्या काळात सर्वात स्वीकार्य अशा सॅन फ्रान्सिस्को भागात घडल्या आहेत या  वास्तवाला न जुमानता या पिडीताना त्यांच्या वर हल्ला केलेल्या हल्लेखोरापेक्षा हि जास्त ते काय आहेत याची ओळख बाहेर न पडू देणे हा सर्वात मोठा प्रश्न होता.

या बचावालेल्या पैकी दोघे जण लोक प्रतिनिधी होते , एक कलावंत आणि दुसरा अमेरीकॅक मुत्सद्दी. हार्वे मिल्कने  , जो कि तेंव्हा चा सॅन फ्रान्सिस्को चा महापौर आणि स्वतः समलिंगी होता , त्यांनी," मी त्यांची अवस्था समजू शकतो. आणि समाजाने त्यांच्यावर आणलेल्या दडपणाचा मी आदर करतो... माझ्या स्वतःच्या भावना नुसार त्यांना प्रकाशात येण्याची इच्छा नाही आहे. लज्जास्पद आहे कि पोलिसांनिकोणाचे हि नाव अधोरेखित अगर कोणा संशयिताला अटक केले नाही आहे, जेणेकरून हा खटला दीर्घ आणि गोठला गेला आहे.

 

वेस्ट मेसा बोन कलेक्टर

फेब्रुवारी 2009 मध्ये, कुत्र्याला घेऊन फिरायला गेलेल्या माणसाला मानवी हाड अनपेक्षितपणे सापडले ज्या वरून वेस्ट मेस ऑफ आल्बकरकी न्यू मेक्सिको हे नाव पडले,. या शोधाची परिणीती अमेरिके च्या इतिहासामध्ये , क्षेत्रफळा नुसार , सर्वात  मोठ्या गुन्हा शृंखले मध्ये झाली   , अज्ञात खुन्या चे डम्पिंग तळघर , जे स्थानिक लोकांना “बोन कलेक्टर” म्हणून माहिती झाले.

अकरा स्रियांचे अवशेष, सगळ्या वेश्या, अखेरीस खणून काढण्यात आले जिथून कित्येक वर्षां मध्ये एखाद्या संभाव्य पुराव्याचा लवलेश हि उजेडात आला नव्हता. DNA  चाचणी विश्लेषण नाही , संभवनीय हत्येचे शस्त्रे नाहीत , संभाव्य व्यक्ती चे वर्णन नाही - काही हि हाताशी आले नाही. परिसरातील सेक्स वर्कर महिला अजून हि भीतीच्या छायेमध्ये राहतात, जरी बर्याच वर्षांमध्ये त्याच्या संदर्भातली खुना ची घटने ची नोंद  नसली तरी हि. काही विवेक हीन ग्राहकांना वेश्यांकडून खुनी इसम असण्याची सूचक मान्यता हि मिळाली आहे. "तो त्यांचा बोगी मॅन आहे  " असे व्यक्तव्य सेफ सेक्स वर्क च्या स्थानिक विना नफा संस्थे च्या संस्थापकाने केले आहे.

त्या परिसरातील सेक्स वर्कर वर होणारे बलात्कार आणि त्यांना होणारी मारहाण या संदर्भातल्या खटल्यांना पोलिसांनी औदासिन्य दाखवणे थांबवले होते  आणि स्थानिक वाईट चालीरीती ची असलेल्या  पुरुष मंडळींची सूची नोंद पुस्तिका नियमितपणे अद्यतनित केली जात होती. स्थानिक सेक्स वर्कर अतिशय सावध झाल्या होत्या. कदाचित या सावधगिरीने खुन्या च्या हालचालीना खीळ बसला असेल, तरी त्याची ओळख अजूनही पूर्ण गूढ आहे.

 

 

 

द अल्फाबेट मर्डरर्स

१९७० सालच्या सुरुवातीच्या काळामध्ये , क्रूरपणे केल्या गेलेल्या हत्येच्या मालिकेने राचेस्टर , न्युयोर्क परिसराला हादरवून सोडले होते. बळी पडलेल्या सगळ्या तरुण मुली होत्या - पण हि एकाच गोष्ट त्यांच्या मध्ये साधर्म्य साधणारी नव्हती. कारमेन कोलन, वान्डा वाकोवित्झ आणि मिशेल माएञ्झा या सगळ्या मधेच अनुप्रासिक अद्याक्षरे होती - ज्यांनी सुरुवातीला माध्यमांना या घटनेला दुहेरी अद्याक्षरे खून मालिका असे नाव द्यायला उद्युक्त केले जे परीक्षणानंतर “अल्फाबेट मर्डर” म्हणून जास्त ठोस राहिले.

अनेक लोकांना या गुन्ह्याच्या संदर्भात प्रश्न विचारले गेले होते. जेंव्हा खर्या अपराध्याचा  शेवटची हत्या करण्याचा मनसुबा एका दीर्घ प्रक्रियेमध्ये होता तेंव्हा एका संशयिताने स्वतःला ठार केले. ज्याचा निरपराधीपणा  २००७ मध्ये त्याच्या मरणोत्तर एका DNA  चाचणीच्या विश्लेषणातून सिद्ध झाला.

त्या शिवाय , एका बळी च्या काकाला मुख्य संशयित म्हणून समजण्यात आले होते , पण त्यांच्यावर कधी हि कुठला गुन्हा दाखल करण्यात नाही आला, उलट जेंव्हा DNA  चाचणी चे विश्लेषण उपलब्ध झाले त्यांना रहित करण्यात आले. राचेस्टर स्थानिक केनेथ बिअञ्चि चे नाव हि फार पूर्वीपासून संशयित च्या घेर्यामध्ये होते. लॉस एंजेलिस ला स्थलांतर केल्यानंतर त्याने आणि त्याच्या चुलत भावंडाने या

 हत्या ना गळा दाबून खून केले आणि त्याला " हिल  साइड स्त्रंगलर  " अशा नावाने ओळख दिली. आणि या दरम्यान राचेस्टर खून खटल्यामधून जरी बिआञ्चि अधिकृतपणे निर्दोष  सुटला नसला तरी त्याच्या वर कोणत्याही प्रकारच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आणि तो अजूनही त्याचा निरपराधीपणा बाळगून आहे .

या व्यतिरिक्त ,  २०११ मध्ये ७७ वर्षीय न्युयोर्क वासी जोसेफ नासो ला १९७० च्या शेवटच्या काळात कॅलिफोर्निया मध्ये   केलेय चार महिलांच्या खुनाचे दोषारोप करण्यात आले. त्याला कदाचित राचेस्टर खून खटल्यासंदर्भात ग्राह्य धरले नसावे, पण त्याने बळी घेतलेल्या व्यक्तींच्या नाव साधर्म्या साठी ,- जी होती, रोक्सेन रोगाश, पामेला पर्सोंस, ट्रेसी तोफोया आणि आश्चर्यकारक रित्या कार्मेन कोलोन. नेमक्या वेळी  कॅलिफोर्निया केस मध्ये नासो चा खटला वारंवार पुढे ढकलण्यात आला, आणि त्याच्या वर राचेस्टर अल्फाबेट खून खटल्याचे दोषारोप हि ठेवले गेले नाही.

 

 

 

 

द मॉनस्टर ऑफ फ्लोरेंस

१९६८ ते १९८५ च्या दरम्यान इटली च्या फ्लोरेंस शहरातील रस्त्यावर एक राक्षस चालत होता. गूढरीत्या दिसेनासे होण्या च्या आधी तो (किंवा ती ), एक २२ कॅलिबर चे पिस्तुल बाळगून होता, १६ लोकांचे खून त्याने केले होते (आणि कधीकधी पिडीत स्त्रियांच्या गुप्तांगा ला इज फोचावली होती. ). हल्लेखोराने जवळजवळ नेहमीच एखाद्या जोडप्याला आपली शिकार बनवले होते आणि हि केस सोडवण्यासाठी पोलिसांना पूर्णपणे निश्चित स्वरूपात निरुपाय केले होते.

तपासा दरम्यान त्यांनी शंभर हजार लोकांच्या मुलाखती घेतल्या...चार वेगवेगळ्या लोकांना , वेगवेगळ्या वेळेत आणि वेगवेगळ्या केल्या गेलेल्या चार खूनांसाठी अपराधी ठरवण्यात आले अर्थातच ते सगळ्याच खुनांसाठी जवाबदार नव्हते. बर्याच लोकांची गुन्ह्यासंबधात धरपकड केली गेली परंतु त्या सार्यांना सोडून देण्यात आले जेंव्हा खुन्याने तीच पिस्तुल आणि खून करण्याची तीच पद्धत वापरून पुनरावृत्ती केली.

स्वंतत्र तपासादरम्यान अशा निष्कर्षापर्यंत येउन ठेपले कि अन्तोनिआ विन्ची , दुसर्या दोघा संशयितांचा नातलग हाच खरा अपराधी आहे; विन्ची अजूनही जिवंत आहे आणि मोकाट आहे , आणि २००८ साली झालेल्या डेटा लाइन मुलाखतीदरम्यान त्याने त्याचा निर्दोश पणा बाळगून असल्याच दाखवून दिले. जो कोणी सैतानी अस्तित्व आहे किंवा होते त्याचा निग्रह तीस वर्षांनतर हि तसाच टिकून राहिला असला पाहिजे.

 

“हायवे ऑफ टिअर्स” मर्डर्स

 

ब्रिटिश कोलंबिया च्या माधोमधून जाणारा सुमारे नऊशे मैल अंतर असणारा कॅनडा महामार्ग १६ जगातील कोणत्याही हायवे पेक्षा जास्त रोमांचकारी आहे. विचित्र आहे पण म्हणून  हायवे ऑफ टिअर्स ओळखले जाणे यात काही वावगे नाही - हा रस्ता इतक्या निर्जन वळणावरून वाहतो कि एखाद्या संकट काळी जेंव्हा वाईट घटना घडत तेंव्हा दूर दूर पर्यंत तुमची किंकाळी ऐकायला कोण हि असणार नसत. आणि अस खरोखरीच घडलेलं आहे- गेल्या काही दशकांमध्ये  लिफ्ट मागितलेल्या नक्कीच चाळीस  एक तरुण स्त्रिया या महामार्ग वर नाहीशा झाल्या आहेत.

बरीच वर्षे, समाधानकारक तपास न केल्याबद्दल कॅनेडियन पोलिसांन दोषी धरले जात होते. बरेच पिडीत हे काळे होते , काहीजंच अस ह म्हणन आहे कि २००२ साली जेंव्हा एका गोऱ्याचा बळी गेला त्या वेळेस खर्या अर्थाने गंभीरने या तासाची मोहीम सुरु झाली.

अधिकृत रित्या हे गोष्ट स्वीकार्य आहे कि अविश्वसनीय पणे पोलिसांना हि हे खूप कठीण आहे. शेकडो मैल पळून जाण्यास सुकर असे रस्ते जे कि शेवटी एका डेड एंड ला पोहोचतात. महामार्गाचे बरेचसे टप्पे हे वाळवंट आहेत, मैल न मैल शहरे वसाहत नाही इतकेच काय  तर मोबाइल फोन साठी हि रेंज नाही किंवा  बर्याच लांब  टप्प्या पर्यंत उपलब्ध च नाही.

अर्थातच नाहीसे होणे जर इतके सहज असेल तर या मागे एका पेक्षा जास्त खुन्यांचा हात असण्याची शक्यता आहे. काही अमेरिकन संशयिताना कॅनेडियन गुन्ह्यांचा संदर्भामध्ये अपराधी ठरवले गेले होते पण कधीच काही सिद्ध झाले नाही, नक्कीच यांपैकी काही संशयितांनी हायवे ऑफ टिअर्स प्रकरण राज्य च्या बाहेर सुरु ठेवलेच असणार. जो पर्यंत पादचार्यांसाठी हायवे अशा प्रकारचे विस्तृत एकले मार्ग पुरवत राहणार तिथे अशा पद्धतीने शिकार होण्याची प्रथा चालूच राहणार.

 

द पच्युरीस पार्क मर्डर्स

रेनबो मानिआ नवनेओलखल्य जाणार्या या खुन्याने ब्राझील च्या साओ  पोलो मध्ये समलिंगी पुरुषांना लक्ष्य बनवले होते - दक्षिण अमेरिकेतील हा भाग सशक्त समलिंगी समुदायाचे माहेर घरांपैकी एक आहे. जो पर्यंत एका वेड्याचा ससेमिरा पाठी लागला नव्हता तो पर्यंत पृथ्वी वरील सर्वात मोठा समलिंगी समुदाया चे यजमान पद हा भाग भूषवित होते. आणि पच्युरीस बाग हि त्यांना भेटण्याची  एक लोकप्रिय जागा होती.

२००७ सालापासून किमान १३ पुरुषांच्या हत्येची हि बाग  साक्षीदार राहिली आहे. पोलिसांच्या म्हणण्या नुसार ओसस्को  जवळपास झालेल्या आणखी तीन हत्येच्या मागे हि हाच खुनी असला पाहिजे. पोलिसांना अशी हि अंतःप्रेरणा आहे कि हा खुनी आधी नक्कीच पोलिस अधिकारी असायला हवा. एवढाच काय तर २००८ सालामध्ये , स्थानिक वृत्तपत्राच्या  वृत्तानुसार ती व्यक्ती निवृत्त अधिकारी जय्रो फ्रान्सिस्को फ्रांको हि असून तिला अटक केली गेली आहे आणि पोलिसांना त्यांचे सावज मिळाले आहे. यानंतर कोणतीही हालचाल किंवा कायाद्याची  अंमलबजावणी झाली  नाही  आणि आजतागायत या  केस ची उकल उलगडलीच नाही.

बायबल जॉन

१९६० च्या सरतेशेवटी , तीन तरुण स्कॉटिश महिलांन बायबल सांगणार्या एका हल्लेखोराकडून मुक्ती मिळाली, आणि तो " बायबल जॉन" या नावाने ओळखला जायला लागला

सगळ्या च बळी पडलेल्या तरुणींचा त्यांच्या स्वतःच्या स्टॉकिंग्ज ने गळा दाबून खून करण्यात आला होता. , ज्या पद्धतीने  खुन्याने त्यांचे रक्ताने भरलेले  पॅड त्यांच्या शरीराभोवती विखरून ठेवले होते त्यावरून हे स्पष्टपणे कळत होते कि सगळ्याच पिडीत तरुणी ची तेंव्हा मासिक पाळी होती.

जीन पुटक, जी मयत हेलेन पुटक ची बहिण होती ती हल्लेखोराचे फारच थोडे वर्णन करू शकली. तिने हल्लेखोरासोबत ( आणि दुर्दैवी बहिणी सोबत ) केवळ एका तासांसाठी टॅक्सी मध्ये सोबत केली होती. त्या माणसाने स्वतःची ओळख जॉन टेम्पलटन म्हणून Karun दिली होती , तो घटके घटके ला बायबल चे वचन उद्धृत करत होता, आणि ज्या प्रकारच्या डान्स हॉलमध्ये तो त्याच्या सावाजना भेटला होता त्यांना तो " डेन्स ऑफ इन इक्विटी " अस संबोधत होता. जीन ला आणि तिच्या मित्राला एका पब ला सोडल्यानंतर हेलेन , जॉन सोबत पुढे गेली ते सकाळी मृत सापडायला , आणि जॉन कोणताही मागमूस न ठेवता नाहीसा झाला होता.

 

द बोस्टन स्ट्रँगलर

जुलै ,१९६२ च्या एका दिवशी  बोस्टन हेराल्ड च्या पहिल्याच पानावरती मोठा ठळक अक्षरात एक बातमी किंचाळत होती , माथेफिरू कडून बोस्टन मधील चार महिलांची हत्या !!! हा असा खटला होता ज्या मध्ये लोकांच्या कल्पना विश्वाने भरार्या घेतल्या, - आणि त्याच वेळी हि शक्यता हि होती कि यातील काहीच कल्पक नव्हते.

१९६२ ते १९६४ च्या दरम्यान बोस्टन मध्ये १९ ते ८५ वयोगटातील १३ महिलांची हत्या करण्यात आली. सगळ्यांची च हत्या सिल्क च्या स्टॉकिंग्ज ने गळा आवळून करण्यात आली होती आणि त्या सगळ्याच लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या होत्या, आणि कोणत्याही घटनेमध्ये जबरदस्तीने घरामध्ये शिरकाव केल्याचे प्रयत्न दिसून येत नव्हते. ऑक्टोबर १९६४ मध्ये ज्या माणसाला , एका महिलेच्या स्वतःच्या च घरात बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली , अल्बर्ट डिसेल्व्हा ज्याने इंतभूत हत्येची माहिती दिली  आणि त्याला दोषी ठरवण्यात आले.

डिसेल्व्हा गुन्ह्याचे पूर्ण  वर्णन करायला सक्षम होता जे कि सार्वजनिक करण्यात आले नाही, पण विनाकारण त्याने हि बर्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या. जेंव्हा त्याचा कबुलीजबाब घेण्यात आला तेंव्हा त्याला एका मानसिक संस्थेमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण त्याच्या काबुलीजाबाबामाधला असम्बाधीतपणा मृत्युच्या सांगितलेल्या चुकीच्या वेळा, गळा दाबून ठार मारण्याची पद्धत, आणि बराच काही कधीच सांगितलं गेल नाही, आणि चिंताजनक रित्या पोलिसांचा असा ठाम विश्वास कि खून एकाने नाही तर एकापेक्षा जास्त लोकांनी केला आहे, आणि खरोखरीच DNA चाचणी विश्लेषणं नुसार डिसेल्व्हा दोषमुक्त होता ज्या हत्येचा कबुलीजबाब त्याने दिला होता.

जोन इ  डग्लस हा एक एफ बी आय एजंट होता , जो पहिला वाहिला असा होता ज्याने  क्रिमिनल प्रोफिले वर असे मत जाहीर  केले होते कि ज्याच्या मतानुसार, डीसेल्वा च्या प्रोफाईल नुसार त्याने  सगलेच खून केलेत हे चुकीचे ठरत असून, सगळ्या खुनांची जवाबदारी आणि श्रेय तो स्वतःकडे घेत असल्याचे दिसून येत होते. याचा अर्थ असा होतो कि जरी या खुनाच्या घटनेला ४० वर्षांहूनही अधिक काळ लोटला असला तरी या खून मालिकेतला एखादा सर्वात कुख्यात मारेकरी बाहेरच्या जगात मोकाट फिरत असेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel