सूचना: हि माहिती फक्त आपल्या मनोरंजनासाठी आहे. हा प्रयोग करून जर तुम्हाला काही त्रास झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही.

ब्लडी मेरी हि एक अशी दंतकथा आख्यायिका आहे कि ज्यामध्ये भूत , प्रेत किंवा आत्मा यांच्या मध्यमातून भविष्य वर्तविले जाते. असे म्हणतात कि अंधार्या खोलीमध्ये हातामध्ये मिणमिणती मेणबत्ती आणि आरसा घेऊन , आरशामध्ये एकटक पाहत तिचे नाव तीन वेळा घेतले कि तीची प्रतिमा आरशामध्ये उमटते.कदाचित ब्लडी मेरीचे भूत पौराणिक ऐतहासिक तफावाती नुसार सहृदय किंवा दुष्ट असेल. ब्लडी मेरीच्या भूताची प्रचीती शक्यतो सामुहिक खेळ खेळताना येते.


आचार पद्धती


ऐतिहासिकदृष्ट्या,  तरुणीने अंधार्या घरामध्ये जळत मेणबत्ती आणि हातात मावेल असा छोटेखानी आरसा हातात घेऊन उलट पावलांनी पायर्या चढत जाणे अपेक्षित आहे. आणि जेंव्हा त्या आरश्यामध्ये एकटक पहिले जाईल तेंव्हा त्यामध्ये त्यांना त्यांच्या होणार्या नवर्याची छबी पाहायला मिळेल.[1] असे असले तरी या हि गोष्टीची शक्यता नेहमीच आहे कि त्यांना त्यामध्ये , या ऐवजी, एखाद्या कवटीची किंवा ग्रीम रिपर ची छबी पाहायला मिळेल जे असे सांगेल कि लग्न होण्यापूर्वी त्यांच्या मृत्यू विधिलिखित आहे.


परंतु हल्लीमध्ये चालणाऱ्या विधींमध्ये, एखाद्या तरुणीला किंवा समूहाला ब्लडी मेरी दिसते जेंव्हा आरशामध्ये पाहण्याची क्रिया करत असताना तिच्या नावाचा धावा केला जातो. हे असे एखाद्या अंधार्या खोलीमध्ये मिणमिणती मेणबत्ती हातात घेऊन किंवा त्या खोलीमध्ये ठेवून सतत तिचे नाव घेतल्यास घडून येते. ब्लडी मेरी चे भूत आधी सांगितल्याप्रमाणे भूत , चेटकीण किंवा आत्माच्या रूपामध्ये येते आणि बर्याच वेळा ते रक्तामध्ये भरलेले असलेले पाहिले गेले आहे. ज्यांना या विधीच्या संदर्भातले विशेष प्रकारचे ज्ञान आहे त्याचं अस म्हणन आहे कि येणारी आत्मा कदाचित सहभागी असणार्यांवर किंचाळताना, त्यांना शिव्या शाप देताना, त्यांचे गळे दाबून त्यांना गुदमरवताना, त्यांचे आत्मे काढून घेताना, त्यांचे रक्त पिताना [3 किंवा त्यांचे डोळे फोडून बाहेर कढताना दिसून येते.[4] जपान मध्ये असणारी आधुनिकपुराणिक कथा, हानाको सान हि बर्याच प्रमाणात ब्लड मेरी शी साधर्म्य साधणारी आहे.


आधुनिक ब्लड मेरी ला टोमणे मारण्यामध्ये भर टाकणारी गोष्ट म्हणजे तिची आणि ऐतहासिक व्यक्तिमत्व राणी मेरी १ यांची सरमिसळ जी तिच्या बाळाच्या संदर्भातली आहे, तिलाच ब्लड मेरी असे म्हणून ओळखले जाते , जिच्या आयुष्यामध्ये अनेक गर्भपात झाले आणि अनेक वेळा ती गरोदर असल्याचे खोटे संकेत तिला मिळाले आणि ती कायम तिच्या हिंसक धार्मिक सुधारणेसाठी स्मरणात राहिली.

घटनेचे स्पष्टीकरण


बर्याच वेळासाठी स्वतःच्या प्रतीबिम्बाकडे आरशामध्ये एकटक पाहणे एखाद्याला मतिभ्रमित करू शकते.[7] चेहर्याचे हावभाव कदाचित वितळायला लागले आहेत , विरघळायला लागले आहेत , अदृश्य होत आहेत असे दिसायला आणि  चेहरा फिरतो आहे तसेच दुसरी मतिभ्रमित करणारे घटक म्हणजे एखाद्या प्राण्याचे किंवा विचित्र प्रकारचे चेहरे दिसण्यास सुरु होते. लेखक जियोव्हानी कपिटो असे लिहितात , असे मतिभ्रमित होण्याला ज्याला ते "विचित्र चेहरा मृगजळ" असे संबोधतात , ज्याला ओळख विलग न करू शकणारा परिणाम असे म्हणून हि ओळखले जाते, ती अद्याप हि मेंदूच्या ओळख देणाऱ्या प्रणालीमध्ये नेमक्या कोणत्या प्रक्रियेमुळे घडून येते हि कळलेले नाही..[7] याच्या व्यतिरिक्त , शक्यता असलेले घटक म्हणजे, भ्रमित विशेष गुण, किमान थोड्या प्रमाणात तरी जे कि ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेला,(Toxler’s fading) )[8][7] क्षीण करतात आणि स्वसंमोहित होण्याची शक्यता हि निर्माण करतात.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel