१९४७ साली रोसवेल, न्यू मेक्सिको, अमेरिका मध्ये एक यान कोसळले. आणेल लोकांनी हि दुर्घटना पहिली. सदर यान परग्रह वासियांचे असावे असे बहुतेकांचे मत आहे. अमेरिकन सरकारने मात्र हे यान नसून आपलाच एक बलून होता असे स्पष्ट केले. पण यान कोसळताच अमेरिकन सैन्याने तेथे धाव घेवून कुणालाही जवळ जावू दिले नाही. सैन्याने जरी तो फक्त बलून होता असे सांगितले तरी कुणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. १९७० पर्यंत अनेक लोकांनी ते परग्रह वासियांचे यान होते आणि अमेरिकन सरकारला त्यातून परग्रह वासियांचे शव सुद्धा प्राप्त झाले होते असे दावे करायला सुरुवात केली.
हे यान जरी १९४७ मध्ये कोसळले तरी त्याबाबत लोकांची उत्सुकता आणि राजकीय वर्तुळातील खळबळ आज सुद्धा कमी झाली नाही. १९७०, १९९१ मध्ये अमेरिकन कॉंग्रेस ( लोकसभा ) ने ह्यावर काही रिपोर्ट प्रकाशित केले. अनेक लोकांनी ह्या विषयावर पुस्तके आणि तुफान लोकप्रिय tv सिरियल प्रकाशित केली.
ग्लेन डेनिस ह्याने १९८९ साली एका tv चेनल वर मुलाखत दिली. सदर व्यक्ती १९४७ साली सैन्यात कामाला होता. त्याने सांगितले कि कोसलेले यान परग्रह वासियांचेच होते आणि त्यातून दोन परग्रह वासी लोकांची शव प्राप्त झाली होती. ह्या शवांचे विच्छेदन होताना त्याने पहिले होते आणि अत्यंत बारकायीने त्याने त्याचे वर्णन केले.
अमेरिकन सरकार सध्या "एरिया ५१" ह्या अतिशय गुप्त भागांत एलियन प्लेन वर रिसर्च करत आहेत अशी अमेरिकेत समजूत आहे. सदर लेखक अमेरिकेत असताना ह्या भागांत जास्त चौकशी साठी गेला होता.