30. द टि रूम सेक्स स्टडी
समाज शास्त्रज्ञ Laud Humphreys यांना बर्याचदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी समलैंगिक चाळे करतात अशा पुरुषांबद्दल नेहमीच आश्चर्य वाटले. त्यांना नेहमीच आश्चर्य वाटले कि का म्हणून " टि रूम सेक्स " - सार्वजनिक विश्रामगृह स्थानांमध्ये मुखमैथुन करणे युनाइटेड स्टेट्स मध्ये बहुतांशी समलैंगिकना अटक करण्यास भाग पडले. Humphreys ने आपल्या वाशिंग्टन विद्यापीठ च्या Ph.D., प्रबंधासाठी  watch queen (एक अशी व्यक्ती जी पाळत ठेवते आणि पोलिस किंवा कोणी अनोळखी व्यक्ती जवळपास येताच खोकते) होण्याचे ठरवले. त्यांच्या संपूर्ण संशोधना मधे त्यांनी शेकडो च्या वर मुखामैथुनाच्या क्रीडा पाहिल्या आणि यांपैकी अनेकांच्या मुलाखती हि घेतल्या. त्यांना असे आढळून आले कि त्यांच्या एकूण प्रयुक्तांपैकी ५४ % विवाहित होते आणि ३८ % खूप स्पष्ट होते कि ते समलैंगिक किंवा उभयलैंगिक नाही आहेत.

29. चाचणी विषय (कसोटी प्रयुक्त) म्हणून तुरुंग कैदी
१९५१ मध्ये , पेनसिल्वेनिया विद्यापीठात, त्वचाशास्त्रज्ञ डॉ अल्बर्ट एम क्लीगमन आणि भविष्यातील रेटीना ए चे संशोधक , यांनी फिलाडेल्फिया च्या होम्सबर्ग तुरुंगातील कैद्यांवर काही प्रयोग करायला सुरुवात केली. जस कि क्लीगमन यांनी नंतर पत्रकारांना सांगितलं, " माझ्या पुढ्यामध्ये जे काही पाहिलं ते होत किती तरी एकर त्वचा. हे अस होत जस कि एखाद्या शेतकऱ्याने पहिल्यांदाच शेत जमीन पहावी.पुढच्या वीस वर्षांमध्ये , कैद्यांनी स्वतःहून क्लीगमन ला स्वतःचे शरीर प्रयोगासाठी वापरू द्यायला अनुमती दिली, ज्यामध्ये टूथपेस्ट, डीओड्रन्ट , शाम्पू, त्वचेच्या क्रीम्स, डीटर्जंट, लिक्विड डाएट , आय ड्रोप, फूट पावडर आणि हेअर डाय यांचा समावेश होता. जरी या प्रयोगामध्ये सतत बायोप्सी चाचण्या आणि वेदनादायक कार्यपद्धती होत्या तरी एका हि कैद्याने दीर्घ काळ हानीचा अनुभव घेतला नाही.

28. हेनेरीएटा लेक्स
१९५५ मध्ये, बलतिमॉर मधील एक गरीब, अशिक्षित , आफ्रिकन - अमेरिकन महिला, हेनेरीएटा लेक्स हिला कल्पना हि नव्हती कि ती एका अशा पेशींचा स्त्रोत आहे ज्यांची नंतर कृत्रिम वाढ करून वैद्यकीय वापर केला गेला. जरी संशोधकांनी या आधीअशा प्रकारे पेशींची वाढ करण्याचा प्रयत्न केला होता, तरी सुद्धा हेनेरीएटा चा प्रयॊग हा पहिला यशस्वी प्रयोग होता ज्यामध्ये पेशी जिवंत ठेवल्या गेल्या आणि क्लोन करून त्यांचे जतन करता आले. हेनेरीएटा च्या पेशी या हेला च्या पेशी म्हणूनओळखल्या जातात, ज्या नंतर पोलिओ लसीकरण साठी कारणीभूत ठरल्या , कर्करोग संशोधन, एडस संशोधन , जनुकांचा मागोवा घेणे आणि किती तरी अगणित इतर वैद्यकीय प्रयत्नांसाठी उपयोगी ठरल्या. हेनेरीएटा कफल्लक मरण पावली आणि तिच्या कुटुंबाच्या दफनभूमी मध्ये एखाद्या समाधी दगडा शिवाय तिचे दफन झाले. दशकभराच्या काळासाठी तिचे पती आणि पाच मुले हि त्यांच्या पत्नीच्या आणि आईच्या आधुनिक वैद्यकीय क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल अंधारात होती.

27. प्रोजेक्ट क्यू के हिल टॉप
१९५४ मध्ये सीआयए ने चीनी ब्रेनवॉश (मूळ मतांचा त्याग करून नवीन मते स्वीकारण्यास भाग पडण्याची एक पाशवी पद्धत ) नामक तंत्राच्या अभ्यासासाठी प्रोजेक्ट क्यू के हिल टॉप नावाचा एक प्रयोग विकसित केला, ज्याचा वापर त्यांनी नंतर चौकशीची नवीन पद्धती विकसित करण्यासाठी केला.विनंतीवजा मागणी करण्यात आल्या नंतर सीआयए ने त्यांना कारावास, हानी, अपमान, यातना, ब्रेन वॉशिंग , संमोहित करणे आणि इतर माहिती देऊ केली, वोल्फ संशोधकाच्या टीम ने याच्या आधारे एका योजनेचे सुत्रीकरण करण्यास सुरुवात केली ज्याच्या माध्यमातून त्यांना गुप्त औषधे आणि मेंदूला हानी पोहोचवतील अशा विविध कार्यपद्धती विकसित करता येतील. त्यांनी लिहिलेल्या एका पत्रानुसार . पूर्णपणे हानी पोहोचवण्याच्या संशोधनाच्या परिणामाची चाचणी करण्याकरिता , वोल्फ यांना सीआयए कडून असे अपेक्षित होते कि,"त्यांनी योग्य असे प्रयुक्त कैदी त्यांना उपलब्ध करून द्यावेत "

26. स्टेटविले तुरुंगातील मलेरिआ अभ्यास
दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान , मलेरिया आणि इतर उष्णकटिबंधीय आजार अमेरिकन लष्कराला पॅसिफिक भागामध्ये बाधा आणत होते. यावरती पकड मिळविण्या साठी मलेरिया संशोधन प्रकल्पाची स्टेटविले तुरुंग , ज्युलिएट, इलिनॉय इथे निर्मिती करण्यात आली. शिकागो विद्यापीठ च्या डॉक्टरांनी १४४ कैद्यांना मलेरिया बाधित डासांकडून दंश करून घेतले. जरी यामधील एक कैदी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला, डॉक्टरांचं म्हणन असा होत कि याचा त्यांच्या अब्यासाशी काही एक संबध नाही आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या आणि प्रशंसनीय ठरलेला हा प्रयोग स्टेटविले च्या तुरुंगामध्ये २९ वर्ष सुरु ठेवला गेला, ज्यामध्ये पहिल्या Primaquine मानवी चाचणी चा हि समावेश होता, ज्याचा औषधे म्हणून आज हि उपयोग मलेरिया आणि न्युमोसायटीस (अज्ञात दर्जा असलेल्या सूक्ष्म जंतूची एक प्रजाती) न्युमोनिया साठी केला जातो.

25. एम्मा एकस्टन आणि सिगमंड फ्रेड
पोटाचे आजार आणि थोडी उदासीनता अशा सारख्या अस्पष्ट लक्षणाच्या आजारासाठी २७ वर्षीय एम्मा एकस्टन ने सिगमंड फ्रेड कडून उपचार करून घेण्या ऐवजी  हिस्टेरिया आणि अति प्रमाणात हस्तमैथुन च्या सवयीसाठी उपचार एका जर्मन डॉक्टर कडून करून घेतले , अशी सवय जी मानसिक स्वास्थासाठी धोकादायक असू शकते. एम्माच्या उपचारांतर्गत एका त्रासदायक प्रायोगिक शस्त्रक्रियेचा समावेश होता ज्यामध्ये तिच्या नाकाच्या आतल्या बाजूने तिला डाग देण्यात आले होते आणि शस्त्रक्रियेच्या आधी केवळ स्थानिक भूल आणि कोकेन च्या सहाय्याने बधिरता आणली गेली होती . यात मुळीच आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कि एम्मा ची शस्त्रक्रिया हे एक आरीष्ट्य च होते. जरी एम्मा एक कायदेशीर वैद्यकीय रुग्ण होती किंवा फ्रेड चा तिच्यामध्ये एक शृंगारिक साधन म्हणून जास्त रस होता तरी अलीकडच्या सिनेमांमधून असेच सुचविले आहे कि फ्रेड ने तिचे उपचार पुढची तीन वर्षे सतत चालू ठेवले.

24. डॉ विल्यम ब्युमोंट आणि पोट
सन १८२२ मध्ये , मक्किनक बेट मिशिगन इथे एका फर च्या व्यापार्याला चुकून अपघाती पोटामध्ये गोळी झाडण्यात आली आणि त्याच्यावर डॉ विल्यम ब्युमोंट यांनी उपचार केले. केलेल्या भाकीताना न जुमानता तो फर चा व्यापारी जिवंत राहिला- पण त्याच्या पोटामध्ये एक भोक - फिशर - कायमचे राहिले जे कि कधीच पूर्णपणे बरे नाही होऊ शकले. ब्युमोंट ने ओळखले कि पोटातील पाचक प्रक्रिया पाहण्याची हि एकमेव नामी संधी आहे आणि त्याने प्रयोग करण्यास सुरु केले. ब्युमोंट एका दोरीला एखादे खाद्य पदार्थ अडकवायचा आणि व्यापारा च्या पोटाच्या भोकातून ती दोरी आत सरकावयाचा. थोड्या थोड्या तासाने ती दोरी बाहेर काढून ब्युमोंट त्या खाद्य पदार्थाचे पचन कशा पद्धतीने झाले आहे हे तपासायचा. जरी हे खूप भेसूर असले तरी हि, ब्युमोंट च्या या प्रयोगामुळे अन्न पचन हि एक यांत्रिक क्रिया नसून रासायनिक प्रक्रिया आहे अशी मान्यता जग भरामध्ये मिळाली.

23. मुलांवरती इलेक्ट्रोशॉक थेरपी
१९६० च्या दशकामध्ये , न्यूयोर्क च्या क्रिडमूर हॉस्पिटल ची डॉक्टर लॉरेटा बेनडेर हिने , सामाजिक समस्या असलेल्या मुलांसाठी तिला विश्वास होता अशी एक क्रांतिकारी उपचार पद्धती - इलेक्ट्रोशॉक सुरु केली. बेनडेर च्या कार्यपद्धती मध्ये , संवेदनशील मुलांना एका मोठ्या समूहासमोर मुलाखातीन्द्वारा प्रश्न विचाराने आणि त्याचे निरीक्षण करणे या गोष्टींचा समावेश होता आणि त्या नंतर त्या मुलाच्या डोक्यावर हलकासा दाब टाकणे. अस मानल गेल कि, जो अशा धक्क्याने किंवा दबावाने हलला जातो त्या मुलाला स्क्रीझोफ्रेनिया ची पूर्व लक्षणे आहेत. ती स्वतः एक गैरसमजुतीच्या बालपणाचा बळी होती , अस म्हटलं जात कि बेनडेर तिच्या निगराणीखाली असलेल्या मुलांना अनुकम्पेने वागवत नाही. जो पर्यंत तिची हि उपचार पद्धती बंद करण्याची वेळ आली तिने १०० पेक्षा हि अधिक मुलावर इलेक्ट्रोशॉक थेरेपी चा वापर केला होता ज्यामध्ये सर्वात लहान वयीन ३ वर्षांचा होता.

22. प्रोजेक्ट अर्तीचोक
१९५० मध्ये, सीआयए च्या वैज्ञानिक गुप्तचर विभागीय कार्यालयाने मनावर ताबा ठेवण्याच्या प्रयोगाची एक योजना मालिका राबवली ज्यामध्ये ते एका प्रश्नांचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करीत होते, कि एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारे नियंत्रण मिळविणे शक्य आहे का ज्यामध्ये ती व्यक्ती स्वतःच्या इच्छे विरुद्ध आणि निसर्गाच्या मुलभूत कायद्यांविरुद्ध आपले बिडिंग करेल. या योजनेतील एक प्रोजेक्ट अर्तीचोक हि होता , ज्यामध्ये संमोहन , जबरदस्तीने अफूचे व्यसन लावणे , ड्रग्ज साठी पैसे काढणे, आणि रासायनिक पद्धतीने अहेतुक मानवी प्रयुक्तानाचा स्मृतीभंश चिथविने अश गोष्टींचा अभ्यास समाविष्ट होता. जरी १९६० च्या मध्यास हा प्रयोग अखेरीस थांबवण्यात आला, प्रकल्प क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मनावरील ताबा यासाठी या प्रोजेक्ट ने नवीन दार उघडे केले.

21. मानसिक अपंग मुलांमधील कावीळ
१९५० मध्ये, विलोब्रेक स्टेट स्कूल , न्युयोर्क येथे मानसिक रित्या अपंग असलेल्या मुलांसाठी चालवल्या गेलेल्या संस्थेने काविळीचा उद्भव यावर प्रयोग करण्यास सुरुवात केली.अस्वचातेच्या कारणामुळे हे साहजिक च होते कि हि मुले काविळी ला बळी पडत होती. डॉ सौल क्रुगमन यांना या उद्भवाचे संशोधन करण्यासाठी पाठविले गेले होते त्यांनी एक प्रयोग करण्याची विचारणा केली ज्याचा उपयोग लसीकरण विकसित करण्यासाठी होऊ शकला असता. असे असले तरी या प्रयोगासाठी , हेतुपुरस्सरपणे या रोगाने बाधित केलेल्या मुलांची गरज होती. जरी क्रुगमन यांचे संशोधन सुरुवातीपासूनच वादग्रस्त होते तरी टीकाकार प्रत्येक मुलाच्या पालकाकडून मिळालेले संमती पत्रक पाहून अखेरीस गप्प बसले. प्रत्यक्षात , स्वतःचे मूल अशा प्रकारच्या प्रयोगासाठी देऊ करणे हा बर्याच वेळा दाटीवाटीने असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश हक्काने शिरकाव करण्याचा एकमेव मार्ग होता.

20. ऑपरेशन मिडनाईट क्लायमॅक्स
सुरुवातीला १९५० मध्ये स्थापित झालेली आणि नंतर सीआयए ने उप-प्रकल्प म्हणून प्रायोजित केलेली , मनावरील नियंत्रण संशोधन कार्यक्रम , ऑपरेशन मिडनाईट क्लायमॅक्स मध्ये वैयक्तिक रित्या लोकांवरती LSD चा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला गेला. सॅन फ्रान्सिस्को आणि न्यू यॉर्क मध्ये ज्यांची सहमती नाही आहे अशा मानवी प्रयुक्ताना , सीआयए च्या पे रोल वरती असलेल्या वेश्येन्मार्फात सेफ हाऊसेस मध्ये आणले गेले आणि त्यांच्या नकळत त्यांना LSD आणि इतर मन बदलविणाऱ्या गोष्टी दिल्या गेल्या आणि एका बाजूने काच असणाऱ्या भिंतींमधून त्याचे अवलोकन करण्यात आले. जरी १९६५ मध्ये अशी सेफ हाऊसेस बंद करण्यात आली , जेंव्हा हि गोष्ट उघडकीस आली कि सीआयए मानवी प्रयुक्तांमध्ये LSD चे अवलोकन करत होते, तेंव्हा ऑपरेशन मिडनाईट क्लायमॅक्स म्हणजे सेक्शुअलि धमकी देणे, संशियीतांवर पळत ठेवणे आणि प्रकल्प क्षेत्रांमध्ये मन बदलविण्याची औषधी वापर करणे यांच्या मोठ्या प्रमाणावर संशोधन साठी एक प्रेक्षागृह ठरले

19. अपघाती  उघड रेडिएशनला सामोरे गेलेल्या मानवाचा अभ्यास
१९५४ मध्ये यु. एस. च्या मार्शल आयलंड वर राहणाऱ्या स्थानिकांनी , हाय यील्ड शस्त्रांमधून बाहेर पडणाऱ्या अति महत्वाच्या गॅमा आणि बिटा किरणाच्या रेडीएशन ला मानवी प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो याचा अभ्यास केला , थोडक्यात सांगायचे तर या अभ्यासाला प्रोजेक्ट ४.१ म्हणून ओळखले जाते जो एक वैद्यकीय अभ्यास होता.जेंव्हा कॅसल ब्राव्हो न्युक्लिअर चाचणी चा निकाल अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादनामध्ये आला तेंव्हा सरकारने अतिशय गुप्त अशा अभ्यास संस्थेची स्थापना केली ज्यामध्ये अपघातीपणे रेडीएशन ला सामोरे गेलेल्या मानवांच्या जखमांच्या प्रखरतेचे मूल्यमापन करता यावे. जरी बर्याच स्त्रोतांचे असे म्हणणे होते कि असे अनावरण होणे हे अहेतुक होते तरी सुधा काही मार्शल वासियांचा असा ठाम विश्वास होता कि प्रोजेक्ट ४.१ हे कॅसल ब्राव्हो न्युक्लिअर चाचणी होण्यापूर्वीच ठरलेले होते. एकंदरीत २३९ मार्शल वासीय या रेडीएशन मध्ये उघड करण्यात आले.

18. द मॉन्सटर स्टडी
१९३९ मध्ये, लोव विद्यापीठाच्या संशोधकांनी, वेन्डेल जोन्सन आणि मेरी टयूडर यांनी डेवेनपोर्ट , लोव येथील २२ अनाथ मुलांवरती तोतरे बोलण्याच्या प्रयोग केला. मुलांना दोन गटांमध्ये विभागले गेले होते, पहिल्या गटातील मुलांना पॉज़िटिव स्पीच थेरेपी दिली गेली ज्यामध्ये त्यांना बोलण्याच्या अस्खलिखीतपणा साठी वाखणले गेले. दुसर्या गटातील मुलांना निगेटिव स्पीच थेरेपी दिली गेली ज्यामध्ये त्यांच्या प्रत्येक चुकीच्या शब्दाच्या उच्चारण साठी त्यांना कमी लेखले गेले. दुसर्या गटातील जी मुले साधारणपणे व्यवस्थित बोलू शकत होती त्यांनी चुकीच्या पद्धतीचे उच्चारण करणे त्यांच्या उर्वरित आयुष्यभरासाठी तसेच ठेवले. नाझी कडून झालेल्या मानवी प्रयोगाचे निष्कर्ष ऐकून जोन्सन आणि मेरी यांनी त्यांच्या “मॉन्सटर प्रयोगाचे” निष्कर्ष कधीच प्रकाशीत केले नाहीत.

17. प्रोजेक्ट एमकेअल्ट्रा
प्रोजेक्ट एमकेअल्ट्रा हे सीआयए ने प्रायोजित केलेल्या एका संशोधन ऑपरेशन कोड नाव आहे ज्यामध्ये मानवी अभियान्त्रिक वर्तणुकी चे प्रयोग केले गेले. १९५३ ते १९७३ च्या दरम्यान या कार्यक्रमामध्ये अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांच्या मानसिक अवस्थेची हाताळणी करण्याकरिता विविध पद्धतींचा वापर केला.या हेतूच्या उद्देश्याची जान नसलेल्या या मानवी प्रयुक्तानावर LSD आणि इतर मन बदलविणाऱ्या ड्रग्ज चे , संमोहन , संवेदनशील हेतूने हानी पोहोचवणे, त्यांना कोणाच्या हि सानिध्या शिवाय एकटे ठेवणे , शाब्दिक आणि लैंगिक छळ करणे , आणि इतर विविध पद्धतीने त्यांना अतिशय यातना पोहोचवणे अशा प्रकारचे प्रयोग करण्यात आले. हे संशोधन विद्यापीठ, रुग्णालये, तुरुंग आणि फार्मास्युटिकल कंपन्या अशा ठिकाणी करण्यात आले. जरी या प्रोजेक्ट्च उद्दिष्ट्य " रोजगाराच्या रासायनिक सक्षम साहित्याची गुप्त कारवाई " विकसित करणे असे होते तरी युएस मध्ये झालेल्या सिआयए च्या हालचालींच्या काँग्रेस-कार्यान्वित तपासामध्ये प्रोजेक्ट एमकेअल्ट्रा बंद करण्यात आले.

16. नवजात शिशुंवरती प्रयोग
१९६० च्या दशकामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी रक्तदाब आणि रक्त प्रवाह बदल अभ्यास करण्याकरिता एका प्रयोगास सुरुवात केली. संशोधकांनी ११३ नवजात शिशु , ज्यांची वयोमर्यादा एक तास ते तीन दिवस अशी होती, अशा बालकांना प्रयोग प्रयुक्त म्हणून वापरले. एका प्रयोगामध्ये , नाळेतून रोहिणी(ह्रदयापासून शरीराकडे रक्त नेणार्‍या वाहिनीतील एक रक्तवाहिनी) आणि जवनिका (ह्रदयापासून रक्त नेणारी मुख्य रक्तनलिका) यांच्यामध्ये कॅथेटर आत घातले. रोहिणी च्या दाबाची परीक्षा करण्याकरीता नवाजातांचे पाय बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवण्यात आले. एका दुसर्या प्रयोगामध्ये ५० अर्भकांना एका सुंता करायच्या बोर्ड वरती पट्ट्याने बांधून ठेवले आणि नंतर तो बोर्ड विरुद्ध दिशे ने फिरवला जेणेकरून त्यांचे पाय वरच्या दिशेला आणि डोके जमिनीच्या दिशेला आले , आणि त्यांचे रक्ताभिसरण डोक्याच्या दिशेने झाले आणि रक्त दाबा ची चाचणी करण्यात आली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel