बाजीरावांचा मृत्यू सत्तेमध्ये असतानाच २८ एप्रिल, १७४० मध्ये झाला. जहागीरीची पाहणी करताना , वयाच्या ३९ व्या वर्षी अचानक आलेल्या तापि मुळे , शक्यतो उष्माघात झाल्यामुळे , त्यांच्यावर मृत्यचे सावट ओढावले. इंदोर शहराच्या नजीक, खार्गोने जिल्ह्यातील त्यांच्या लष्करी छावणीमध्ये ते दिल्लीला स्वतःच्या नेतृत्वाखाली असलेल्या एक लाख सैन्य दलासह मार्गस्थ झालेले होते. नर्मदा नदीच्या तीरावर , सानवाड खार्गोने इथे २८ एप्रिल १७४० रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधीयांकडून त्यांचे स्मारक बांधण्यात आले. त्यांचे वास्तव्य असलेल्या वास्तूचे अवशेष आणि शिव मंदिर हि जवळच स्थापित केलेले आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.