डॅनियल डग्लस होम हे १९ व्या शतकातील ‘माध्यम’ म्हणून सर्वात जास्त गाजलेलं प्रस्थ होत.. जरी त्यांचे नाव आज च्या काळात तितकेसे सुपरिचित नसेल तरी हि, त्यांनी प्रेक्षकांना, मित्र परिवाराला , राज्यांच्या प्रमुखांना आणि श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांना त्यांच्या चमत्कारिक अलौकिक पराक्रमाने आणि दैवी सामर्थ्याने चकित केले होते. त्यांच्या दिसून येणाऱ्या अचाट शक्तीने , पराक्रम पाहिलेल्या अनेकांना , गोंधळात टाकले , ज्यांमध्ये अनेक शास्त्रज्ञ आणि पत्रकारांचा हि समावेश होता.
खरोखरीच डी. डी. होम यांना विलक्षण अलौकिक क्षमता प्राप्त होत्या का ?
का ते एक त्यांच्या काळाच्या खूप पुढे असलेले , दैवी देणगी लाभलेले जादुगार होते, ज्यांना अगदी जवळून पाहणाऱ्या निरीक्षकांना हि हलकाश्या हातचलाखीने आणि जादूच्या मोहजालाने फसवून धोका देणे सहज शक्य होते ? असे असले तरी नक्कीच अनेक समकालीन संशयवादी होते, ज्यांनी होम वर एक चतुर फसवा असे जाहीर पणे आरोप केले होते, होम कशा प्रकारे अविश्वसनीय प्रदर्शने करू शकतो हे सिद्ध करणे त्यांना कधी हि शक्य झाले नाही.
आजच्या घटकेला होम च्या संदर्भात अनेक गूढ गोष्टीच आहेत.
एक मोहक विलक्षणता
होम (उच्चारण ह्यूम) चा जन्म १८३३ मध्ये क्युरी, स्कॉटलॅंड येथे झाला. अनेक बर्याच लोकांप्रमाणे जे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा शो बिझनेस साठी प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे होम ने पण त्याच्या पूर्व आयुष्य आणि मिळालेल्या वारश्या बद्दल अतिशयोक्तीपूर्ण किंवा बनवत तपशील दिलेले असावेत असे दिसून येते. उदाहरणार्थ, त्याचा डॅनियल होम म्हणून बाप्तिस्मा झालेला होता आणि असे दिसते कि त्याने डॅंग्लस हे मधले नाव आपण हून अंगिकारले होते.जरी त्याने असा दावा केला होता कि त्याचे वडील हे स्कॉटलॅंड च्या दहाव्या राजाचे अनौरस पुत्र होते, तरी वास्तवामध्ये त्याचे वडील एक साधारण मजूर आणि बर्याच अंशी शिवीगाळ करणारे दारुडे होते. बाल असतानाच त्यांना त्यांचा एका मावशीने दत्तक घेतले होते आणि वयाच्या नवव्या वर्षी ते आपल्या नवीन कुटुंबियांसमवेत अमेरिकेला आणले गेले , जिथे कनेक्टिकट या ठिकाणी ते स्थायिक झाले.
आपल्या बालपणा बद्दल हि होम ने काही कल्पत मिथ्या कथा निर्माण केल्या होत्या.
त्यांनी सांगितले किलीशोर्वाया पासून च त्यांना पूर्व संकेत मिळत असत. वयाच्या १७ व्या वर्षी अद्भुत गोष्टी घडण्यास सुरु होई जेंव्हा ते आपल्या खोलीमध्ये प्रवेश करीत : गूढ थपकावण्याचा आवाज त्यांना ऐकू येई आणि फर्निचर आपोआप हलण्यास सुरु होत असत. या कथा म्हणजे होम ने स्वतःच्या गूढ व्यक्तिमत्वासाठी तयार केलेल्या होत्या का खरच हे भविष्यामध्ये होम ला प्राप्त होणार्या अलौकिक शक्तीचे संकेत होते , जे कि त्याला नंतर नियंत्रण करणे शक्य होणार होते ?
जरी त्याने थोडे फार औपचारिक शिक्षण केले होते , तरी मोठेपणी होन अनेक विविध विषयांवरती बौद्धिक पातळीवर व्यासंगी बोलू शकत असे, पियानो वादन करत असे , आणि त्याने सहजपणे बुद्धी आणि आकर्षकता यांचा मेळ घालणे विकसित केले होते जे कि त्याला त्याच्या व्यावसायिकतेला 'व्यावसायिक गृह अतिथी' म्हणून सुलभ होते. हि ती वेळ होती जेंव्हा खर्या अर्थाने त्याच्या असाधारण क्षमता प्रसिद्धीस आल्या. त्याची आधीच 'माध्यम' म्हणून असलेली ओळख त्याच्या सभांमधून बनलेली होती, आणि जे अशा सभांमध्ये सहभागी होते त्यांनी ते अस्वाभाविक , आणि त्याच्याकडे असलेली स्पष्ट रूपाने दिसणारी शक्ती दिव्य स्वरूपातील आणि स्वास्थ्य प्रद आहे असे जाहीर केले होते.
अद्भुत करामत
त्यांच्या एकंदरीत वादाच्या भोवर्यात असलेल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये डी. डी. होम ने जगासमोर आपल्या काहीच करामतींचे प्रदर्शन केले. :
• एका दिवे लावलेल्या आणि उजेड असलेल्या खोलीमध्ये , हॉर्वर्ड चे प्रोफेसर डेविड वेल्स आणि अन्य तीन अध्यात्मिक अन्वेशकांपुढे, होम ने एका टेबलाला पूर्णपणे हलवून दाखविले होते जेंव्हा तो तिथे कुठे हि जवळपास नसताना. तिथे असलेल्या दोन साक्षीदारांना स्वतःची पूर्ण शक्ती पणाला लावून टेबलाला स्थिर करावे लागले. आणि टेबल ला सोडल्यानंतर तो टेबल जमिनीपासून काही अंतराच्या उंचीवर पूर्णपणे अधांतरी होता. जेंचा वेल्स आणि इतर दोघे त्या टेबलावर बसून राहिले तेंव्हा हि त्या टेबलाचे हलणे सुरूच होते. त्यांच्याकडे या अनुभवासाठी कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नव्हते.
• १८५२ मध्ये, होम ने पहिल्यांदा स्वतःला अधांतरी ठेवण्याचे प्रदर्शन केले. साक्षीदार अचंबित झाले जेंव्हा त्यांनी हे पहिले कि होम ने स्वतःला जमिनीपासून एक फूट किंवा त्या पेक्षा जास्तच उंचीवर उचलले आहे. जेंव्हा त्यांनी होम ला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तेंव्हा होम सकट ते हि हवेत उचलले गेले.
• सत्रांच्या दरम्यान ते बनावटी हात दिसून यायला करत असत, जे तिथे बसलेले लोक जाणवू शकत असत. १८५७ मध्ये त्याने नेपोलिअन III आणि त्यांची पत्नी, युजीनीसोबत पॅरिस मध्ये एक सत्र केले होते. त्यांच्या पत्नीने त्या वेळेस एका आत्म्याचा हात हातात धरला होता जो कि आपल्या मृत वडिलांचा असल्याचे तिला जाणवले --- कारण तिच्या वडिलांना हाताला एकच बोट होते.
• त्याला त्याचे शरीर जास्तीत जास्त ११ इंच वाढवता येत असे.
• जुलै १८६८ च्या सत्रामध्ये , एका ग्राहकाच्या घरामध्ये एका साधारणपणे उजेड असलेल्या रूम मध्ये त्या यजमानाच्या वृद्ध आई बसलेल्या खुर्चीमध्ये , खुर्चीसकट अधांतरी झाल्या.
• डिसेंबर १८६८ मध्ये, होम ने कदाचित त्यांचा आतापर्यंतच्या सगळ्यात चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यांच्या लंडन येथील राहत्या अपार्टमेंट मध्ये तीन प्रतिष्ठित सभ्य व्यक्तीसोबत होम ने एक सत्र भरविले. काही "परंपरागत " आत्म्याच्या छायेनंतर, होम ने त्या रूम मध्ये चालण्यास सुरु केले. त्याच्या शरीराची लांबी वाढलेली होती , आणि उपस्थित साक्षीदारांच्या मतानुसार , त्या नंतर होम जमिनीपासून उचलला गेला. जमिनीवर परत उतरत असताना तो लगतच्या असलेल्या रूम मध्ये गेला. एका माणसाला त्या रूम ची खिडकी उघडली गेल्याचे ऐकायला आले आणि लगेच थोड्या वेळात होम खिडकीच्या बाहेर हवेमध्ये तरंगत असल्याचे दिसून आले. अपार्टमेंट तीन मजले उंच होते. होम ने बाहेरच्या बाजूने खिडकी उघडली , आणि त्या नंतर "सर्वात आधी संथपणे पाय रूम मध्ये सरकवून आत आले आणि खाली बसले "
• १८७१ मध्ये, विल्यम क्रूक्स ने होम ची परीक्षा घेतली, जे कि एक प्रतिष्ठित भौतिकशास्त्रज्ञ आणि राजकीय समाजाचे सदस्य होते. त्यांनी स्वतः अविष्कार केलेल्या एका मशीन च्या मदतीने, क्रूक्स ने , "जोर, शक्ती किंवा तिचा प्रभाव , हातातून पुढे जाणे " या गोष्टींचे मोजमाप केले. क्रूक्स ने मोजले कि शक्ती हि जवळपास एका पौंड च्या तीन क्वार्टर शी समान आहे, आणि हे स्पष्टीकरण देण्यामध्ये त्याचे पूर्णपणे नुकसान झाले. क्रूक्स ने होम चे हवेमध्ये अधांतरी होणे हि साक्ष केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले, आणि स्वतः लिहिलेल्या "वैज्ञानिक विश्वास सर्वात घट्टपणे रुजलेल्या लेखाला " ला आव्हान केले.
• त्याने अनेक वेळा केलेल्या प्रदर्शनामध्ये, होम त्याच्या उघड्या हातामध्ये पांढरे जळते निखारे धरू शकत असे. त्याला बर्याच वेळा त्याचे हात आणि चेहरा शेकोटीच्या आगीमध्ये धरताना पहिले गेले होते, आणि जणू काही आंघोळ करत आहे अशा प्रकारे तो ते हलवीत असे. आणि त्याच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या जखम दिसत नसत.
हौदिनी आव्हान
होमने अनेकांना चकित केले होते, पण सगळ्यांनाच नाही. हेरी हौदिनी, ज्याला आध्यात्मिक लोकांच्या आणि सत्रांच्या दंभ स्फोटासाठी ओळखले जात , त्याने होमवर तो फसवा असलेले जाहीर आरोप केले आणि दावा केला कि होम करत असलेल्या अधांतरी कामगिरीची नक्कल तो करू शकतो. ...जरी त्याने असे कधी आधी केलेले नसले तरी हि. आणि जसे कि अनेक संशायावादी लोकांना खात्री होती कि होम ची सगळी प्रदर्शने केवळ काही तरी गोम असलेली आहेत , असे असताना हि होम एकदा हि - त्याच्या कोणत्याही, १५०० सत्रांमध्ये - कोणत्याही प्रकारची फसवणूक करताना किंवा लबाडी उघडकीस येताना पकडला गेला.
त्याच्या या वास्तवाने त्याला अतिशय प्रतिष्ठा मिळवून दिली.
म्हणून, जेंव्हा अनेक करणे आहेत जी होम एक उत्कृष्ठ दैवी देणगी लाभलेला जादुगार आणि भ्रमित करणारा आहे--- समानतेच्या कक्षावर कदाचित - आज हि भ्रमित करणाऱ्या काही उत्कृष्ठ लोकांसहित - अशा प्रकारचे अधांतरी राहणे सिद्ध झाले नाही. आणि होम च्या अनेक किमया या लक्ख प्रकाशाच्या उजेडामध्ये आणि साक्षीदारांच्या बारकाईने तपासणी करण्याच्या दृष्टीने पूर्ण झाल्या, होम ला त्याच्या काळाचा सर्वात चांगला आणि उत्कृष्ठ दर्जाचा जादुगार समजण्यात येते.--किंवा विलक्षण आणि स्पष्टीकरण देत येणार नाही अशा क्षमता असलेला एक सच्चा माध्यम .
यातून एक मनोरंजक मुद्दा सांगायचा झाला तर, जर कोणी असे सांगितले कि होम च्या अंगभूत क्षमता या अद्भुत किंवा दैवी देणगी लाभलेल्या नव्हत्या : होम ने स्वतःला एक माध्यम असे प्रदर्शित न करता एक जादुगार म्हणून प्रदर्शित केले असते तरआज हि त्याचा दरारा प्रसिद्ध हौदिनी पेक्षा हि किती तरी मोठा मानण्यात आणि लक्षात ठेवण्यात आला असता.