हिंदू , एका जीवाने अनेक जन्म घेण्याची प्रक्रियेची कित्येक कारण सांगतात .
१. आपल्या कर्माची फळ भोगण्यासाठी : दुसरा जन्म घेण्याचे हे एक सगळ्यात प्रमुख कारण आहे . सलिक कर्माची फळ म्हणून माणसाला स्वर्ग मिळतो . राजस कर्माच फळ म्हणून
मृत्युलोक प्राप्त होतो आणि तामस कर्माच फळ म्हणून पाताळात जावं लागतं .
२. आपल्या इच्छा पूर्तीसाठी : जेव्हा व्यक्ती भोग आणि विलासाचा शौकीन होतो तेव्हा त्याचा आनंद घेण्यासाठी त्याची वासना तीव्र होते . ती आपली लालसा पूर्ण करण्यासाठी जीवाला
नवीन शरीर घेण्यासाठी मजबूर करते .
३. आपली अर्धी साधना पूर्ण करण्यासाठी : जेव्हा एखादा व्यक्ती मोहापासून सुटण्यासाठी अध्यात्मिक प्रयत्न करत असते आणि ते मिळवण्याआधीच मृत्यू आला तर तो जीव आपली
साधना पूर्ण करण्यासाठी दुसर्या शरीरात प्रवेश करतो .
४. कर्ज उतरवण्यासाठी : जेव्हा एखादा जिवाच दुसर्यावर कर्ज असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो . तेव्हा जीव एक नातेवाईक , मित्र किंवा शत्रू बनून
जन्म घेतो .
५. कोणत्यातरी महान आत्म्याने दिलेल्या शापाचा त्रास सहन करण्यासाठी : कोणत्याही व्यक्तीच घोर पाप एखाद्या देवाच किंवा कृषीच्या प्रकोपाला आमंत्रित करू शकतं . त्याचं फळ
म्हणजे जीवाला आणखी एक जन्म घ्यावा लागतो , जो मनुष्य रूपातच असेल असं नाही .
६. मोक्ष प्राप्तीसाठी : देव किंवा कोणत्याही गुरूच्या कृपेने जीवाला नवीन शरीर मिळतं ज्यामुळे तो मोक्ष प्राप्त करू शकेल .
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.