मिठाराम : काय रे तसबीरविक्या ! ध्रुव-नारायणाची किंमत काय?

तसबीरविक्या : तुमच्याजवळ किती पैसे आहेत रे? पैसे आहेत की उगाच विचारता? पळवाल हो तसबीर !

शशी : आम्ही काही चोर नाही!

मिठाराम : आमच्याजवळ चारच आणे आहेत. तेवढ्याला तसबीर देतोस का?

तसबिरविक्या : आणा चार आणे.तुम्हाला म्हणून मी तसबीर देतो.
मिठारामने चार आणे दिले. ती तसबीर घेऊन ते दोघे मुलगे घरी निघाले. शशीने तसबीर हातात घेतली व हृदयाशी धरली. शशीने आपले डोके त्या तसबिरावर ठेविले. देवदर्शनासाठी ते देवळात शिरले. तेथे कोण तुफान गर्दी ! मिठाराम गर्दीत हरवला. शशीला देव दिसेना. मोठे मोठे धटिंगण घुसत होते ! मुलांना देव आधी पाहू द्यावा, असे कोणाच्याच मनात येईना. मिशाळ लोक देव पाहात होते व या बालदेवांना पायांनी चुरडीत होते ! शशीने एका हातात तसबीर घट्ट धरली होती. इतक्यात कोणी तरी ढकलले. ध्रुव-नारायणाची तसबीर फुटली ! “आहो, माझी तसबीर ! अहो-” असे म्हणून शशी रडू लागला. फुटकी तसबीर घेऊन त्या गर्दीतून शशी रडत रडत बाहेर आला.

आत्याबाई आता रागावतील- शशीला रडू येऊ लागले. तो त्या तसबीरविक्याचे दुकान शोधू लागला. सापडले एकदाचे ते दुकान.

शशी : दुकानदार दादा, तुम्ही दिलेली तसबीर फुटली.

दुकानदार : मी काय करू त्याला ?

शशी : ही घेऊन तुम्ही दुसरी देता का ?

दुकानदार : वाहवा ! हा धंदा नाही मी शिकलो अजून. फुटकी तसबीर घेऊन कोणी नवीन का देतो? चल चालता हो !

शशी : तुम्हाला लहान मुलांची दया नाही येत ?

दुकानदार
: तुमच्याजवळ पैसे आहेत का ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel