बोनी एलिझाबेथ पार्कर (1 ऑक्टोबर 1910 - 23 मे 1934) व क्लाईड चेस्टनट बैरो (24 मार्च १९०९ - २३ मई १९३४) हे ग्रेट डिप्रेशनच्या काळात मध्य अमेरिकेतील नागरिकांना लुटणारे आणि मारणारे दोन गुन्हेगार होते. अनेकदा बक बैरो, ब्लांच बैरो, रेमंड हॅमिल्टन, डब्लू डी जोंस . जो पामर , राल्फ फुल्ट्स आणि हेनरी मेथ्विन हे ही त्यांच्या टोळीत सामिल असत. 1931 ते 1935 दरम्यान 'पब्लिक एनिमी' काळात त्यांनी अमेरिकेतील नागरिकांचं लक्ष वेधलं होतं. या टोळीने कमीत कमी ९ पोलिस अधिकाऱ्यांना आणि असंख्य नागरिकांना यमसदनी पोहोचवलं होतं. शेवटी पोलिसांनी या टोळीला लुसिआनाच्या बेंविल्ले शहराजवळ घेरून मारलं. 'बोनी आणि क्लाईड' या 1964 च्या अमेरिकन सिनेमामुळे त्यांच्या आठवणी परत जाग्या झाल्या. या सिनेमात फाये डनअवे आणि वारेन बेट्टी हे मुख्य भुमिकेत होते.
बोनी पार्करच्या खऱ्या आयुष्यात आणि तिच्या मिडीयात दाखवल्या गेलेल्या प्रतिमेमध्ये खूप फरक होता. ती जवळपास शंभरहून जास्त चोऱ्यांमध्ये बैरोची साथीदार होती पण मिडीयाने तिला जसं एखाद्या मशिनगन चालवणाऱ्या गुन्हेगाराप्रमाणे दाखवलं होतं तशी ती नव्हती. त्यांच्या दुसऱ्या एका साथीदाराने, डब्ल्यू डी जोन्स, ने नंतर केलेल्या खुलास्याप्रमाणे त्यांनी बोनीला कधीच कुठल्याच पोलिस अधिकाऱ्यावर गोळ्या चालवताना पाहिलं नव्हतं.