क्लाइड चेस्टनट बैरो (२४ मार्च १९०९ -२३ मे  १९३४ ) चा जन्म डलासच्या अग्नेयेस असलेल्या टेलिको शहरातल्या एलिस काऊंटीच्या एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. तो त्याच्या आई-वडीलांच्या सात अपत्यांपैकी पाचवा होता. १९२० च्या सुरूवातीला तो पैसे कमवण्यासाठी पश्चिम डलासला गेला जिथे सुरूवातीचे काही दिवस त्याने घोडागाडीवर काढले. १९२६ मधे जेव्हा क्लाईड भाड्यावर घेतलेली एक गाडी वेळेत परत करू शकला नाही तेव्हा त्याला पहिल्यांदा अटक झाली.  दुसऱ्यांदा त्याचा भाऊ मार्विन बैरो बरोबर चोरी करून टर्कीला जात असताना तो पकडला गेला.  १९२७ ते  १९२९ दरम्यान नोकरी असूनही तो तिजोरी फोडणे, दुकानं लुटणे, कार पळवणे असे छोटे-मोठे अपराध करत राहिला. १९२८ आणि १९२९ मधल्या अटकेनंतर एप्रील १९३० मधे त्याला ईस्ट होम तुरूंगात पाठवलं गेलं. जेलमधे बैरोने त्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका कैद्याचं, एड क्रोव्दरलचं, डोकं लीड पाईपाने फोडलं. हा त्याचा पहिला खून होता, पण दुसऱ्याच एका कैद्याने या खुनाचा आरोप स्वतःवर घेतला.बैरोने शेतात काम करावं लागू नये म्हणून एका कैद्याला सांगून आपल्या पायाची दोन बोटं कुऱ्हाडीने कापून घेतली. त्याचा परिणाम म्हणजे पुढे आयुष्यभर लंगडत चालावं लागलं.

फेब्रुवारी १९३२ ला तुरींगातून सुटलेला बैरो आता एक प्राणघातक गुन्हेगार झाला होता. त्याच्या बहिणीने सांगितलं की तुरूंगात असताना त्याच्यावर काहीतरी वाईट बेतलं असणार कारण बाहेर आल्यावर बैरो पुर्वीसारखा राहिला नव्हता. त्याच्याबरोबरच्या राल्फ फुल्ट्स नावाच्या एका कैद्याने सांगितलं की - "आम्ही त्याला एका शाळकरी मुलातून विषारी सापात बदलताना पाहिलंय." जेलमधून बाहेर आल्यावर बैरोने किराणा दुकानं, गॅस स्टेशन लुटणे यासारखे छोटे गुन्हे केले. एम् १९१८ ब्राउनिंग आटोमेटिक रायफल हे त्याचं आवडतं हत्यार होतं. जॉन नील फिलीप्सच्या मते बैरोच्या आयुष्याचं ध्येय बॅंका लुटून पैसे कमवणं कधीच नव्हतं. त्याचं ध्येयं हे तुरूंगात त्याच्यावर झालेल्या अत्याचारांचा सूड उगवण होतं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel