बोनी आणि क्लाईडची पहिली भेट ही क्लारेंस क्ले (क्लाईडची मैत्रिण) च्या १०५ , हर्बर्ट स्ट्रीटच्या घरी ५ जानेवारी १९३० ला झाली. पार्करला तेव्हा काहीच काम नव्हतं त्यामुळे ती पश्चिम डलासला रहाणाऱ्या तिच्या एका मैत्रिणीची मदत करत होती जिचा हात मोडला होता. बैरो जेव्हा त्या मैत्रिणीला भेटायला आला तेव्हा पार्कर किचनमधे चॉकलेट्स बनवत होती. जेव्हा दोघं भेटले तेव्हा एकमेकांसाठी वेडे झाले. अनेक इतिहासकारांचं मत आहे की पार्करचं बैरोवर प्रमे असल्याने तिने त्याची साथ केली. एक दिवस यासगळ्याचा परिणाम केवळ मरण असणार आहे हे माहिती असूनही ती प्रत्येक गुन्ह्यात त्याला साथ देत गेली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.