२१ जुलै १९५७ ला चार किशोर एल सेगुंडोच्या लेवर्स लेनमध्ये आपल्या गाडीत बसले होते. एक बंदुक धरलेला माणुस त्यांच्या गाडीजवळ आला, त्याने चारही मुलांचे हात पाय बांधले आणि पुढे बसलेल्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने सर्व गाडी आणि इतर किमती वस्तू चोरल्या आणि पिडीतांना रस्त्याशेजारी आहे त्या कपड्यांवर सोडुन दिलं. या गुन्ह्यानंतर ९० मिनीटांनी आरोपी एका लाल सिग्नलवर आला जिथे दोन तरूण - रिचर्ड फिलीप्स व मिल्टव कर्टिस- या नव्याने भरती झालेल्या पोलिसांनी त्याला पाहिलं. ते ड्रायव्हरच्या दरवाज्यापर्यंत पोहोचले तोवरच आरोपीने त्या दोघांनाही गोळ्या घातल्या. आरोपी पुढे गाडी घेऊन फरार झाला. २००३ मध्ये एफ. बी. आय. ने घटनास्थळी सापडलेले फिंगरप्रींट्स गेराल्ड मेसनच्या १९५६ मध्ये एका चोरीत सापडलेल्या संकेतांशी जुळवुन पाहिले. २००३ पर्यंत गेराल्ड ला एक बायको आणि ३ मुलं होती ज्यामुळे तो एक जबाबदार नागरिक वाटत होता. पण पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला आणि उरलेले पुरावे शोधुन काढले. त्याच्या पाठीवर असलेली गोळी लागल्याची खूण पोलिसांनी चालवलेल्या गोळीसारखीच होती. आणि त्याचं अक्षरही बंदुक खरेदी केलेल्या एका बिलावर असलेल्या हस्ताक्षराशी जुळलं. मेसनला सात वर्षांची शिक्षा झाली आणि २००९ मध्ये पैरोलसाठी त्याला नाकारण्यात आलं. त्याने इतके घृणास्पद गुन्हे का केले हे कधीच सांगितलं नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel