२२ मार्च १९७८ ला ग्लेनडेल च्या एका तरूणीला सामसूम रस्त्यावर गोळी मारण्यात आली. तरूणीला लगेच जवळच्याच एका स्थानिक रूग्णालयात नेण्यात आलं आणि थोड्याच वेळात तिला मृत म्हणून घोषित करण्यात आलं. पिडीत तरूणीचं नाव सुसन स्च्मिद्त असं होतं आणि घडलेल्या घटनेने सर्वच आई – वडील आपापल्या मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताग्रस्त झाले. लोकांना वाटलं की तिचाच कोणीतरी प्रियकर असेल किंवा चोरीच्या उद्देशाने तिला मारण्यात आलं असावं. पण जवळपास ४० वर्षे तपास करूनही तिच्या खुनाचं कारण समजलं नाही. त्या रात्री पोलिसांना आणि स्च्मिद्त परिवाराने केसला प्रत्येक दृष्टीने तपासुन पाहिलं पण हाती काहीच लागलं नाही. एका साक्षीदाराने कारच्या जवळ एका अज्ञात पुरूषाला पाहिलं होतं पण एवढंच पुरेसं नव्हतं. वेळोवेळी पोलिसांनी आणि स्च्मिद्त परिवाराने जनतेकडे पुराव्यांची विनंती केली पण प्रयत्नांना यश आलं नाही. पोलिसांना वाटलं कि गुन्हेगार सुसनच्या ओळखीतलाच होता कारण तिला जवळून गोळी मारण्यात आली होती. प्रत्येक शांत झालेल्या केस प्रमाणे या ही केसमधल्या सर्व पुराव्यांची काही काही वर्षांनतर नवनव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तपासणी झाली. शेवटी तपासकर्ते ब्रिस्टल, वर्जिनीया च्या एडवर्ड माईनहोल्डपाशी पोहोचले जो ५४ वर्षांचा होता. माईनहोल्ड घटनेतच्या वेळी १७ वर्षांचा होता आणि त्याचा हिंसक गुन्हे करण्याचा काही रेकॉर्ड नव्हता. म्हणून त्याच्यावर आधी संशय आला नाही.
माईनहोल्ड खुनाच्या गुन्ह्यात संशयाच्या बळावर अटकेत आला होता पण त्याने खुनात हात असण्याला नकार दिला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.