तीन मुलांची आई असलेली हेलन १९७३ मध्ये तिच्या नॉर्थ लॉंग बीच च्या घराजवळ मृत अवस्थेत सापडली. तिच्या गुन्हेगाराचा तपास लागायला ४० वर्ष गेली. त्यावेळी सगळेच पुरावे एकत्र केले गेले होते तरी तांत्रिकी मर्यादांमुळे काही ठोस असे पुरावे सापडले नाहीत. केस रि-ओपन झाल्यावर आणि पोलिस डेटाबेसमध्ये पुन्हा एकदा डि. एन. ए. चा तपास केल्यावर या गुन्हात एमानुएल मिलर- एका कुप्रसिद्ध गुन्हेगाराचा हात असल्याचं सिद्ध झालं. पण न्याय थोडा उशीरा मिळाला. मिलर काही वर्षांपुर्वीच मेला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.