बघणाऱ्यासाठी पीटर आणि रोसा कारूसोचं लग्न आदर्श होतं. ५० वर्षांनतरही ते दोघं प्रेमात आहेत असं वाटायचं. ते ऑस्ट्रेलियाच्या बुर्न्स्विच्कच्या इटालियन पंथाचे सदस्य होते. पण सत्न याहुन वेगळं होतं. २००८ ला रोसाला ३६ वेळा चाकुने मारलं गेलं. तिच्या मृत्यूचं सत्याने सगळ्यांना हादरवुन सोडलं. जेव्हा पीटर त्याच्या परिवाराबरोबर असायचा, तो प्रचंड क्रुर, असभ्य आणि हेवानासारखा वागायचा. तो त्याच्या एका अपत्याला मानसिक त्रास द्यायचा जे नेहमीच त्याच्या आणि रोसामधल्या भांडणाचं कारण बनायचं. यासगळ्या भांडणांमध्ये पीटर नेहमी हाणामारीवर यायचा. पीटरने त्याच्या बायकोचा खून का केला हे माहिती नाही पण त्याने आधीच असं भासवलं की घरात चोरी झाली आहे. बऱ्याच दुकानात फिरल्यावर पीटरने पालिसांना फोन केला. अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्याने पटकन आपल्या दुकानातल्या खरेदीचं बिल त्यांना दाखवलं. यावरून पोलिसांना संशय आला. २०१५ मध्ये ८१ वर्षांचा आसताना त्याचा मृत्यू झाला तरीही तोपर्यंत त्याला आपल्या कामांचा काहीही पश्चात्ताप झाला नव्हता.