मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला .
मला म्हटला : आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो .
मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो .
मी काही बोलणार तेवढ्यात , मित्राची आई हातात पिशवी घेवून इथे स्वत येवून पोहचली .
मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं,
“भल्या माणसा , हि कसली चेष्टा करतोयस वेड्या , आई तर आहे तुझ्या बाजूला ..’’
मित्रानी आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला , अरे भाऊ, आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्या एवजी मी आईला जिवंतपणी च तृप्त करू इच्छितो . त्याचे असे मत होते कि , ‘’जीवन्तपनीच आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करने म्हणजेच खरे श्राध्द’’ .
तो पुढे म्हटला , ‘’आईला मधुमेह आहे , पण गोड खायला आवडते ,, म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून राखतो, जे जे तिला आवडत ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात , अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’ , आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला . सकाळी आई गीता वाचायला बसते नियमित, मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे कि देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा, आईचा चष्मा साफ करण्यानी अधिकच पुण्य मिळेल’’.
आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला, मी घरी येवून सुन्न मनानी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो .
मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटल . रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरच ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाही , एवढे निश्चित . अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही . त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते . खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल , पैस्यापेक्षा प्रेम , आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात .
आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबादारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरे पूर जाणीव असते . पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाही ,, त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतर वृद्धः माता पिता , कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो . यावर कवी धर्मेश ची ओळ आहे : ''आधी माता मग पिता ..मग घेईन प्रभू नाम ...मला नकोय दुसरे तीर्थ् धाम'' .!! पण आता, समाज बदललाय . लोकांची भाषा , वर्तवणूक , आणि जीवनशैलीवर पश्चिमेची सावली पडलीय .
मुळ लेख : સૌજન્ય : સુજલભાઈ પટેલ
मराठी अनुवाद : जयवंत पाटील बोरसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.