माणूस घडवण्याआधी : खंड ८

लोकसंख्येला नियंत्रण हवे !!

Author:अभिषेक ठमके

नुसते मुल जन्माला घालून फायदा नाहीं.. त्यांचे व्यवस्थीत संगोपन आणि संस्कार करने महत्वाचे.. "नाहीतर एवढी मोठी रांग उभी केली" आणि आयुष्यभर डोक्याला ताप... आज च्या काळात दहा मुल म्हणजे सगळे धूतराष्ट्राचे मुलंच की.. दुर्योधनाचे भाऊ.. !!
१) जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला,तेव्हा भारत बांगलादेश आणि पाकिस्तान मिळून आपली लोकसंख्या होती ४० करोड.
२) जेव्हा पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा आपली लोकसंख्या ३३ करोड होती.
३) आज २०१२ मधे आपली लोकसंख्येने आश्चर्य कारक आकडा पार केला आहे म्हणजे "१२५ करोड".
४) मागील ६४ वर्षा मधे आपली लोकसंख्या ९० करोड ने वाढली आहे.आपण लवकरच चीन ला लोकसंख्ये मधे मागे टाकणार आहोत.
५) जर लोकसंख्या वाढण्याचे प्रमाण असेच राहिले तर,सरकार आणि खाजगी क्षेत्रांनी कितीही ठरविले आणि प्रयत्न केले तरी,ते जनतेला हवी ती सूख सुविधा ते उपलब्ध करून देऊ शकणार नाहीं.
६) आज लोकसंख्या/जनसंख्या विस्फोट हे संपूर्ण जगाची समस्या आहे.
७) जनसंख्या विस्फोटामुळे , लाखो /करोडो सामान्य जन आणि सुशिक्षित जनता गावा कडून शहराकडे नोकरी, धंदा, चांगले शिक्षण आणि अधिक पैसा ह्यासाठी स्थलांतर करतात. ह्यामुळे सर्वं शहर बकाल झाली आहेत. गुन्हेगारी,बेरोजगारी आणि हवेतील प्रदुषण वाढलेले आहे. ह्यामुळेच जनसंख्या विस्फोट सरकारसाठी मोठी समस्या बनली आहे. आणि हीच डोके दुखी सर्वं प्रगत राष्ट्रात देखील आहे.
८) आपला शेजारी देश,चीन पण ह्या समस्येमुळे काही वर्षा पूर्वी फारच चिंतीत होता.
९) मग त्यांनी “एक कुटुंब एक मुल” मग ते मुलगी असो की मुलगा असे धोरण अवलंबल्यामुळे त्यांच्या बऱ्याच समस्येचे निवारण झाले आहे.
१०) आपल्या देशात स्वार्थी राज्यकरते आणि घाणेरड्या राजकारणामुळे ते लोकसंख्येवर अवरोध आणीत नाही. काही नेत्यांना देशाच्या हिताबद्दल काडीमात्र आवड नाहीं आहे.
११) मुलींची संख्या आपल्या देशात कमी होत आहे, अश्या धोरणा मुळे,मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत वाढेल.
१२) जर आपल्या देशाला खरच सर्वच क्षेत्रात प्रगती करायची असेल,तर आपल्या सरकारने लवकरात लवकर “चीन” सारखे “एक कुटुंब एक मुल” असे धोरण अवलंबले पाहिजे.मग ते मुल मुलगी असो वा मुलगा.त्यामध्ये अपवाद असो शकतो,जसे काही मातांना “जुळे” मुल होऊ शकतात.
१३) चीन मधे जर दुसरे मुल झाले तर त्यांना फार मोठा दंड सरकारला द्यावा लागतो,आणि बऱ्याच सुविधांना मुकावे लागते.
१४) म्हणून सरकारला लोकसंख्या नियंत्रित ठेवण्या साठी कडक कायदा आपल्या देशात आणावा लागेल. जर दुसरे मुल झाले तर त्यांना पैश्याचा रुपात दंड करावा ह्यामुळे सरकारची तिजोरी भरेल, सुविधा बंद करने जसे निवडणुका लढू न देणे, प्रोमोशन न देणे इत्यादी.. हे उदारहण देण्याचे कारण असे की सरकारने असे धोरण अवलंबणे जरुरी आहे जेणे करून ते लोकसंख्येला आळा घालू शकतील.

लेखं- कमलेश एम वाझे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to माणूस घडवण्याआधी : खंड ८