दान्तिदुर्गाने राष्ट्रकुट साम्राज्याची स्थापना केली. हे साम्राज्य त्याकाळचं
अत्यंत शक्तिशाली साम्राज्य होतं. सुरूवातीला त्यांची राजधानी लात्तालुरू(सातूर) होती पण नंतर ती
बदलून मान्यकेता (मलखेड) करण्यात आली.
आमोघ्वर्षा (इ.स. ८१४-८८०) राष्ट्रकुट राजांपैकी सर्वात प्रसिद्ध झाला. त्याची अनेक काळाची सत्ता जैन धर्माचा प्रसार व क्षेत्रीय साहित्याच्या विकासासाठी ओळखली जाते. अमोघ्वर्षाचा पणतू तिसरा इंद्र याने प्रतिहार राजा महिपाल यावर मात केली. तिसरा कृष्ण हा राष्ट्रकुट साम्राज्याचा शेवटचा महान राजा होता. राष्ट्रकुट कला आणि निर्मीतीचे खूप चाहते होते. पहिला कृष्ण याने वेरूळ येथे कैलासमंदिराच उभारले. घारापुरी (मुंबई जवळचे एलिफंटा) गुहेची उभारणी ही याच साम्राज्यात झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.