अमिताभ बच्चन (जन्म-११ ऑक्टोबर) हे चित्रपट सुर्ष्टीचे सर्वात लोकप्रिय नट आहेत. १९७० च्या दशकात त्यांनी खूपच लोकप्रियता मिळवली आणि तेव्हापासून ते भारतीय सिनेमाच्या इतिहासात त्यांना प्रमुख व्यक्तीमत्व मिळाले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पारितोषिक मिळवली, ज्यात तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि बारा फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून ते नामांकित आहेत. अभिनया व्यतिरिक्त त्यांनी पार्श्वगायक, चित्रपट निर्माता, टीवी प्रस्तोता आणि भारतीय संसदेत एका निर्वाचित सदस्याच्या स्वरुपात १९८४ ते १९८७ पर्यंत त्यांनी काम केले. त्यांनी सुप्रसिद्ध टी.वी. मालिका “कौन बनेगा करोडपती” मध्येसुद्धा होस्ट म्हणून काम केले.
अमिताभ बच्चन यांचा विवाह अभिनेत्री जया भादुरी यांच्या सोबत झाला. त्यांना दोन मुले आहेत. श्वेता नंदा आणि अभिषेक बच्चन. अभिषेक बच्चन हे सुद्धा नट आहेत आणि त्यांचा विवाह ऐश्वर्या राय हिच्या सोबत झाला आहे. पोलिओ निर्मुलन अभियानानंतर बच्चन आता तंबाखू निषेध परीयोजनेवर काम करणार आहेत. अमिताभ बच्चन यांना एप्रिल २००५ मध्ये एच आय वी/ एडस आणि पोलिओ निर्मुलन अभियान यामध्ये युनिसेफ गुडविल एंबेसडर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.