ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा नारी शक्ती बद्दल साधा उल्लेखही कुठे होत नसे. सावित्रीबाई यांच्यावर दगड आणि शेण फेकलं जायचं कारण त्या मुलांसोबत मुलींनाही शिक्षण देत असत. ज्योतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले भारतात स्त्री - शिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या. आपले पती ज्योतीराव फुले यांच्या प्रभावाने सावित्रीबाईंनी स्त्री - शिक्षण आणि या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि चांगले जीवनमान यांना आपल्या जीवनाचे ध्येय मानले होते.
त्यांनी ब्रिटीश साम्राज्याच्या राजवटीत स्त्री - जीवनात सुधारणा घडवून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.