एकदा पार्वती आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना जोराने हसली. त्या हास्यातून एका विशाल पुरुषाची उत्पत्ती झाली. पार्वतीने त्याचे नाव मम (ममता) असे ठेवले. तो मम पार्वतीला भेटल्यानंतर जंगलात तपश्चर्येसाठी निघून गेला. तिथे त्याची भेट शंबरासुर या दैत्याशी झाली. शंबरासुराने त्याला अनेक असुरी विद्या शिकवल्या. त्याने मम याला गणपतीची उपासना करण्यास सांगितले. मम ने गणपतीला प्रसन्न करून ब्रम्हांड राज्याचे वरदान मागितले.
शंबराने त्याचा विवाह आपली कन्या मोहिनी हिच्याशी करून दिला. जेव्हा शुक्राचार्यांनी ममाने केलेल्या तपस्येबद्द्ल ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला दैत्यराज या पदावर विराजमान केल्याचे घोषित केले. ममासुराने देखील अत्याचार सुरु केले आणि सर्व देवताना कैद करून तुरुंगात डांबून ठेवले. तेव्हा देवतांनी गणेशाची उपासना केली. गणेशांनी विघ्नराज या रुपात अवतार घेतला. त्यांनी ममासुराची मान मुरगाळून देवतांची सुटका केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel