''आपणाला ही चिठी घेऊन मी आले आहे.''
त्याने ती चिठी घेतली. ती त्याच्या चेहर्याकडे बघत होती. तो मधून तिच्याकडे बघत होता. त्याची मुद्रा गंभीर झाली. त्याच्या डोळयांत का पाणी आले?
''आपण आतल्या खोलीत बसून बोलू ये बाळ.'' तो तिला म्हणाला.
तिला आश्चर्य वाटले. ती बाळ हाक ऐकून तिला आपलेपणा वाटला. त्या एका शब्दाने जणू सारा परकेपणा पार वितळून गेला. एखाद्या शब्दात केवढी विलक्षण जादू असते!
हेमा रंगरावांबरोबर आतील खोलीत गेली. तेथे कोच होती. ती एकावर बसली.
''कधी आलांत तुम्ही परमुलुखातून?'' त्याने विचारले.
''महिना झाला. तुमचा पत्ता काढीत हिंडत आलो. आईला आता बरे वाटेल.''
''तुझे नाव काय?''
''हेमा.''
''सारे नाव काय?''
''हेमा जयंत हारीत.''
''आडनाव हारीत?''
''हो.''
''हारीत हे तर नाव असते.''
''परंतु आमचे आडनाव आहे.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.