कर्मयोग


हिंदू धर्माचे खरे सौंदर्य म्हणजे त्याचे कर्म संयम आहेत, म्हणजे तुम्ही माणूस असा, संत असा किंवा देव असा, तुमची पारख ही तुमच्या कार्मावरूनच केली जाईल.
जवळपास सर्व कौरव मृत्यू पश्चात स्वर्गात गेले, परंतु पांडवांपैकी फक्त युधिष्ठीर स्वर्गात गेला, कारण बाकीच्यांनी युद्धात चुकीच्या मार्गांचा अवलंब केला होता.
गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला होता, त्यामुळे संपूर्ण यादव समुदाय फार विचित्र पद्धतीने मारला गेला. नदीजवळ फिरायला गेलेले असताना त्यांच्यात भांडण झाले, भांडणाची परिणती लढाईत झाली आणि संपूर्ण परिवाराने एकमेकांना मारून टाकले. कृष्ण केवळ बघत उभा राहू शकला.
जेव्हा शंकराने गणपतीचे शीर छाटले तेव्हा ते त्यांना परत जोडता आले नाही. त्या प्रसंगी त्यांनी तेच केले जे कर्माच्या दृष्टीने योग्य होते.
कामदेवाची पत्नी रती हिने पार्वतीला शाप दिला होता की तिच्या पोटी कधीही मूल जन्माला येणार नाही. त्यामुळे गणपती, कार्तिकेय आणि अशोकसुंदरी यांचा जन्म वेगळ्या माध्यमातून झाला आहे.
चंद्राला प्रजापतीने शाप दिला होता की त्याला क्षयरोग होईल. त्यामुळेच चंद्र वाढत आणि घटत राहतो.
एकदा विष्णूदेव पती पत्नीच्या विरहाला कारणीभूत ठरले. त्यांना शाप मिळाला आणि पुढील जन्मात रामाच्या रुपात त्यांना देखील आपल्या पत्नीचा विरह सहन करावा लागला.
अजूनही अनेक अशी उदाहरणे आहेत जिथे देवांनी मनुष्यासारखे शाप भोगले. हिंदू धर्मासारखा संयम अन्य कोणत्याही धर्मात आढळत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel