असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर कोणते संकट येते, तेव्हा भगवंत अवतार घेऊन त्या संकटाला दूर करतात. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी अनेक वेळा या पृथ्वीवर अवतार घेतला आहे. भगवान शंकराच्या १९ अवतारांबद्दल आपण आपल्याला मीहिती आहेच, आज आपण भगवान विष्णूंच्या २४ अवतारांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. यापैकी २३ अवतार आतापर्यंत पृथ्वीवर अवतरून गेले आहेत. तर २४ वा अवतार "कल्की अवतारा"च्या रूपाने अजून होणे बाकी आहे. या २४ अवतारांपैकी १० अवतार हे भगवान विष्णूंचे प्रमुख अवतार मानले जातात. ते म्हणजे मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, कल्कि अवतार.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.