एकदा ब्रम्हदेव आपल्या सभेत बसले होते. तेव्हा तिथे त्यांचे मानसपुत्र सनकादी आले आणि ब्रम्हदेवाशी मनुष्याच्या मोक्षाबद्दल चर्चा करू लागले. तेवढ्यात तिथे श्री विष्णू हंसाच्या रुपात हजर झाले आणि त्यांनी सनकादी मुनींच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर सर्वांनी भगवान हंसाची पूजा केली. त्यानंतर हंसाच्या रूपातील भगवंत आपल्या पवित्र धामाला निघून गेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.