धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर यांच्या पालन पोषणाची जबाबदारी भीष्मांवर होती. तिघे पुत्र जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांना विद्याभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आले. धृतराष्ट्र बलविद्येत श्रेष्ठ बनला, पंडू धनुर्विद्येत तर विदुर धर्म आणि नीतिशास्त्रात पारंगत झाले. तिघे पुत्र युवा झाले तेव्हा मोठा भाऊ धृतराष्ट्र याच्या ऐवजी पंडूला राजा करण्यात आले, कारण धृतराष्ट्र आंधळा होता आणि विदुर दासीपुत्र होता. पंडूच्या मृत्युनंतर धृतराष्ट्राला राजा करण्यात आले. धृतराष्ट्राला आपल्या नंतर युधिष्ठिराने राजा व्हायला नको होते. तर त्याला आपला पुत्र दुर्योधन राजा व्हायला हवा होता. म्हणून त्याने आयुष्यभर पांडवांची उपेक्षाच केली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.