पुराणातील कथांनुसार हनुमानाची माता अंजनी ही संतान सुखापासून वंचित होती. अनेक प्रयत्न, व्रत वैकल्य करून देखील तिच्या पदरी निराशाच पडली. या दुःखाने ग्रस्त अंजनी मतंग ऋषींकडे गेली. तेव्हा मतंग ऋषींनी तिला सांगितले की पप्पा सरोवराच्या पूर्वेला एक नरसिंह आश्रम आहे, त्याच्या दक्षिण दिशेला नारायण पर्वतावर स्वामी तीर्थ आहे, तिथे जाऊन त्यात स्नान करून, बारा वर्ष तप आणि उपवास करावा लागेल, तरच तुला पुत्रसुखाची प्राप्ती होईल. अंजनीने मतंग ऋषी आणि आपल्या पतीकडून संमती घेऊन बारा वर्ष तप केले. बारा वर्ष केवळ वायुभक्षण करून राहिली, तेव्हा वायुदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर दिला ज्याच परिणाम म्हणून चैत्र शुक्ल पौर्णिमेला अंजनीला पुत्रप्राप्ती झाली. वायू कडून मिळालेल्या या पुत्राला ऋषींनी वायुपुत्र नाव दिले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.