ब्रह्मवैवर्त पुराणानुसार एकदा भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी परशुराम कैलासात गेले. भगवान तेव्हा ध्यानात मग्न होते. तेव्हा गणपतीने परशुरामाला भगवान शंकराला भेटू दिले नाही. या गोष्टीमुळे चिडून जाऊन परशुरामाने आपल्या परशूने गणपतीवर वार केला. हा परशू स्वतः शंकराने परशुरामाला दिला होता. गणपती त्या पर्शुचा वार खाली जाऊ देऊ इच्छित नव्हते. म्हणून त्यांनी तो वार आपल्या दातावर झेलला. ज्यामुळे त्यांचा एक दात तुटला. तेव्हापासून गणपतीला एकदंत हे नाव पडले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.